Dharmendra News: हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात चर्चेत राहिलेल्या प्रेम प्रकरणांपैकी एक असलेल्या धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या नात्यात अनेक नाट्यमय वळणे आली. 1980 मध्ये त्यांनी लग्न केले, पण त्याआधी हेमा मालिनी यांचे लग्न दुसऱ्याच एका मोठ्या अभिनेत्यासोबत ठरले होते. ही बातमी समजताच धर्मेंद्र यांनी थेट लग्नाच्या ठिकाणी धडक दिली आणि मोठा गोंधळ उडाला.
अभिनेत्रीच्या वडिलांनी संतापून धर्मेंद्र यांना 'तुम्ही माझ्या मुलीच्या आयुष्यातून चालते व्हा' (Why don't you get out) असे सुनावल्याचा किस्सा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
काय होता 'चेन्नई वेडिंग'चा किस्सा?
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचे प्रेम 'शोले'च्या सेटवर बहरले. 1970 च्या दशकाच्या मध्यात त्यांचे नाते जगजाहीर झाले होते. पण अडचण एकच होती, धर्मेंद्र आधीच प्रकाश कौर यांच्याशी विवाहित होते आणि त्यांना 4 मुले होती.
( नक्की वाचा : Dharmendra : 'यमला पगला दिवाना' माझा चित्रपट होता, धर्मेंद्र यांचा फोन आला आणि...सचिन पिळगावकरांचा मोठा खुलासा )
हेमा मालिनी यांच्या आई जया चक्रवर्ती यांचा या नात्याला तीव्र विरोध होता. त्यांनी हे नाते तोडण्यासाठी आपल्या मुलीचे लग्न अभिनेता जितेंद्र यांच्याशी ठरवले. जितेंद्र हे हेमा मालिनी यांचे अनेक चित्रपटांतील सहकलाकार होते. चेन्नईमध्ये एका गुप्त समारंभात हे लग्न होणार होते.
धर्मेंद्र यांनी गाठले चेन्नई
या लग्नाची बातमी एका टॅब्लॉइडला लागली आणि ती वाऱ्यासारखी पसरली.धर्मेंद्र यांना ही बातमी कळताच ते स्तब्ध झाले. रिपोर्ट्सनुसार, ते थोडे नशेतही होते. त्यांनी तातडीने चेन्नईला जाणाऱ्या विमानाचे तिकीट बुक केले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, त्यावेळी जितेंद्र यांची गर्लफ्रेंड शोभा सिप्पी (नंतर शोभा कपूर) देखील त्यांच्यासोबत चेन्नईला गेल्या होत्या.
लग्न मंडपात हाय व्होल्टेज ड्रामा
धर्मेंद्र थेट लग्नाच्या ठिकाणी पोहोचले.तिथे मोठा गोंधळ उडाला.हेमा मालिनी यांचे वडील व्ही.एस.रामानुजम चक्रवर्ती खूप संतापले आणि त्यांनी धर्मेंद्र यांना सुनावले, "तुम्ही माझ्या मुलीच्या आयुष्यातून चालते व्हा.तुम्ही विवाहित आहात,तुम्ही माझ्या मुलीशी लग्न करू शकत नाही."
( नक्की वाचा : Dharmendra Net Worth: धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती किती? 100 एकर जागेत बनवलंय फार्म हाऊस, वाचा सर्व डिटेल्स )
हेमा मालिनी झाल्या भावुक
या रागाच्या भरातही धर्मेंद्र यांना हेमा मालिनी यांच्याशी खाजगीत बोलायची परवानगी मिळाली. त्यांच्यात काय बोलणे झाले हे कधीच समोर आले नाही, पण सूत्रांनुसार धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांना लग्न थांबवण्याची विनंती केली. हेमा मालिनी भावुक झाल्या आणि त्यांनी निर्णय घेण्यासाठी वेळ मागितला, ज्यामुळे लग्नसोहळा थांबला.
विशेष म्हणजे,जितेंद्र यांनाही या लग्नात फारसा रस नव्हता. त्यांनी एका मित्राला सांगितले होते, "मला हेमाशी लग्न करायचे नाही. माझे तिच्यावर प्रेम नाही, तिचे माझ्यावर नाही. पण माझ्या कुटुंबाची इच्छा आहे म्हणून मी तयार झालो."
( नक्की वाचा : Palash Muchhal : 'स्मृतीपेक्षाही दोघांची जास्त जवळीक', पलाश ढसढसा रडला, आईनं सांगितलं 'त्या' दिवशी काय घडलं? )
अखेर प्रेम जिंकले
जितेंद्र यांनी 1974 मध्ये शोभा सिप्पी यांच्याशी लग्न केले. त्यानंतर 6 वर्षांनी, 1980 मध्ये, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी अत्यंत साध्या समारंभात लग्न करून आपल्या दीर्घकाळच्या प्रेमकथेला पूर्णविराम दिला.
नुकतेच धर्मेंद्र यांचे निधन झाल्याच्या अफवा पसरल्यामुळे त्यांच्या आयुष्यातील हे नाट्यमय किस्से पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.