Gaurav More Home: गौरव मोरेचं 1.78 कोटींचं अलिशान घर कसं आहे? पाहा VIDEO

म्हाडाच्या मुंबई मंडळाने मागील वर्षी 2,030 घरांसाठी सोडत जाहीर केली होती.  गौरव मोरेने कलाकार कोट्यातून पवई येथील उच्च उत्पन्न गटातील (HIG) घरासाठी अर्ज केला होता

जाहिरात
Read Time: 2 mins
gaurav more

Gaurav More Home: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता गौरव मोरे याचे मोठे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. मुंबईतील 'फिल्टरपाड्याच्या चाळीतून' पवईतील आलिशान टॉवरमध्ये आता गौरव दाखल होणार आहे. त्याला म्हाडा लॉटरीमधून उच्च उत्पन्न गटातील (HIG) घर लागले असून, नुकतीच त्याला या घराची चावी देखील मिळाली आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाने मागील वर्षी 2,030 घरांसाठी सोडत जाहीर केली होती.  गौरव मोरेने कलाकार कोट्यातून पवई येथील उच्च उत्पन्न गटातील (HIG) घरासाठी अर्ज केला होता आणि या सोडतीत तो विजेता ठरला होता. गौरव मोरेला पवई येथील म्हाडाच्या एचआयजी श्रेणीत मिळालेले घर अंदाजे किंमत 1 कोटी 78 लाख रुपयांचे आहे.

(नक्की वाचा-Gaurav More New Home: 'फिल्टरपाड्याच्या बच्चन'चा पत्ता बदलला! गौरव मोरेची चाळीतून अलिशान टॉवरमध्ये एन्ट्री)

VIDEO- कसं आहे गौरव मोरेचं घर?

गौरव मोरेचं हे घर कसं आहे याचा अंदाज खालील एका व्हिडीओवरून येईल. मिळालेल्या माहितीनुसार खालील व्हिडीओत दाखवण्यात सॅम्पल फ्लॅटसारखाच फ्लॅट गौरव मोरेला मिळाला आहे. दोन बेडरूम, हॉल, किचन असं स्केअर फूटांचं हे घर आहे.

गौरव मोरेची पोस्ट

घराची चावी मिळाल्यानंतर गौरव मोरेने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला होता. गौरवने म्हटलं की, "ताडपत्री ते फ्लॅट... फिल्टर पाडा ते पवई हा प्रवास बघताना खूप छोटा वाटतो, पण तो पूर्ण करण्यासाठी खूप वर्ष लागली आहे. जिथे राहतो तिथेच आपल घर असाव हे कायम मनात होत. लहानपणापासून वाटत होत जिथे राहतो तिथेच घर घ्यायचं आणि आज ते स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरलं. काल दिनांक 25 सप्टेंबर रोजी आम्हाला आमच्या पवईच्या नवीन घराचा ताबा मिळाला. ताडपत्री ते फ्लॅट असा हा प्रवास आहे. काल घरच्यांना त्या घराचा आनंद घेताना बघून मन भरून आलं आणि वाटलं आपण आपल्या परिवारासाठी काहीतरी केलं. माझी नाळ कायम फिल्टर पाडा आणि पवईसोबत जोडली गेली आहे आणि ती कधीच तुटणार नाही. माझ हे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी म्हाडाचे मनापासून आभार मानतो.

Advertisement

Topics mentioned in this article