RS 370 Biryani Controversy: सोशल मीडियावर सध्या 370 रुपयांच्या बिर्याणीचा वाद चांगलाच चर्चेत आहे. कॉमेडियन प्रणित मोरे याच्या कार्यक्रमात हिमांशु जांगडा या तरुणाने मुलींबाबत अत्यंत अश्लील विधान केले ज्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली. या विधानानंतर जांगडा याची नोकरी गेली असून त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण वादावर आता स्वत: हिमांशु जांगडा याने गुरुग्रामस्थित कंपनी स्टारविक डिझाइन या कंपनीचे संस्थापक विवेक विश्वकर्मा यांच्याशी सविस्तर संवाद साधत संपूर्ण प्रकरण सांगितलं आहे.
शोमध्ये गेल्याचा पश्चात्ताप...
आपल्या माजी बॉससोबतच्या संवादात जांगराने स्पष्ट केले की सोशल मीडियावर सुरू झालेला वाद हळूहळू त्याच्या वैयक्तिक आयुष्यात पसरला आहे. तसेच मी सध्या खूप वाईट अवस्थेत आहे, मी खूप तणावात आहे. आता जेव्हा मी माझ्या कुटुंबाला पाहतो तेव्हा मला त्या शोमध्ये गेल्याचा पश्चात्ताप होतो, असंही तो म्हणाला. त्याने सांगितले की, "तुम्हाला माहीत आहेच की, गेल्या दोन आठवड्यांपासून मला इंस्टाग्रामवर खूप ट्रोल केले जात आहे. आठवडाभर याबद्दल कोणालाच माहीत नव्हते. घरी किंवा माझ्या गावी कोणालाच याबद्दल माहीत नव्हते, पण गेल्या रविवारी माझ्या काकांना याबद्दल समजले. व्हायरल क्लिप्स पाहिल्यानंतर त्यांच्या काकांनी त्यांना फोन करून स्पष्टीकरण मागितले.
जांगडा म्हणाला, "माझ्या काकांनी मला फोन करून विचारले की काय चालले आहे? मी त्यांना सर्व काही समजावून सांगितले, ते माझ्यावर रागावले आणि मी त्या शोमध्ये का गेलो होतो? असा सवाल केला. पण मला कल्पना नव्हती की पुढच्या दोन दिवसांत मला यासाठी इतक्या द्वेषाचा सामना करावा लागेल. तो व्हिडिओ माझ्या नातेवाईकांपर्यंत आणि शेजाऱ्यांपर्यंत पोहोचला."
शेजाऱ्यांनी घेरलं
जांगराच्या म्हणण्यानुसार, शेजारी त्याच्या घरी आले आणि त्यांनी त्याला त्या कमेंट्सबद्दल विचारणा केली. जांगरा म्हणाला, "शेजारी माझ्या घरी आले आणि त्यांनी माझ्या आई-वडिलांना सांगितले की त्यांचा मुलगा त्या व्हिडिओमध्ये आहे. ही खूप लाजिरवाणी गोष्ट होती. तेव्हाच कुटुंबाला याबद्दल कळले. यानंतर, त्याच्या कुटुंबीयांनी त्याला घरी बोलावून त्याच्याशी याबद्दल बोलले. नोकरी गमावल्यानंतर तो आणखी तणावात आहे. मला कामावरून काढून टाकल्याचे समजले तेव्हा वाईट वाटले. आता माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणि मला नोटीससुद्धा मिळाली आहे
तो म्हणाला, "खरं तर, मी या शोचा एक एपिसोड आधी पाहिला होता; गुडगावमध्ये तो पहिल्यांदाच होत होता. तो बहुतेक करून मुंबईत होतो. मी विचार केला, एकदा जाऊन बघूया कसं होतं ते. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी एखादा कॉमेडी शो पाहिला होता. तसेच मी शोमध्ये सांगितलेली सगळीच स्टोरी खरी नव्हती, असा दावाही त्याने केला. त्याने असाही युक्तिवाद केला की, त्याने त्या संभाषणाकडे मनोरंजन म्हणून पाहिले,
VIDEO: 'मी त्याला थांबवायला हवं होतं, पण...' 370 रुपयांची बिर्याणी' वादावर प्रणित मोरेने मौन सोडलं
"मी तिथे जे काही बोललो ते फक्त 'मनोरंजनासाठी' होते. माझा तसा कोणताही हेतू नव्हता, माझे तसे कोणतेही विचार नव्हते. कार्यक्रमाच्या ठिकाणच्या वातावरणामुळे त्याला पुढे बोलण्यास प्रोत्साहन मिळाले. वातावरण असे होते की लोक ते मनोरंजन म्हणून घेत होते. कॉमेडियन प्रणीत मोरेच्या प्रतिक्रियेनेही त्याला प्रोत्साहन मिळाले, असंही त्याने स्पष्ट केले आहे.