Pranit More 370 Biryani Controversy : मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे. ही पोस्ट कॉमेडियन प्रणित मोरेच्या 370 रुपये बिर्याणी वादविवाद प्रकरणाशी संबंधीत आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये एक उदाहरणाच्या माध्यमातून परवानगी (Consent) आणि जबाबदारी (accountability) चा मेसेज देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. दरम्यान,या पोस्टबाबत लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला आहे.काही लोक हे एक मेसेज असल्याचं म्हणत आहेत. तर काहींनी यावर सवालही उपस्थित केले आहेत.
काय आहे 370 रुपये बिर्याणी प्रकरण?
370 रुपये बिर्याणी वाद तेव्हा सुरू झाला,जेव्हा कॉमेडियन प्रणित मोरेच्या स्टँड-अप शो दरम्यान एका प्रेक्षकाने डेट संबंधीत एक किस्सा सांगितला. त्याने म्हटलं की, डेटला गेल्यावर एक तरुणीसाठी 370 रुपयांची बिर्याणी खरेदी केली होती. त्या मोबदल्यात तिच्याकडून काही अपेक्षा ठेवल्याचं त्याने म्हटलं.त्याने तरुणीसोबत जे काही केलं, ते प्रेक्षकांसमोर उघडपणे सांगितलं. त्यानंतर याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि लोकांमध्ये संतापाची लाट पसरली. महिलांचा अनादर करून त्यांना अश्लील भाषेत बोलणं पूर्णपणे चुकीचं असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या. कोणाला जेवणाची पार्टी दिली किंवा त्यांच्यासाठी पैसे खर्च केले,याचा अर्थ असा नाही की,तुम्ही त्या व्यक्तीकडून चुकीच्या अपेक्षा ठेवायच्या, असंही लोकांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> Mumbai News: भांडुपमधील 'या' परिसरात स्थानिकांचा आक्रोश, एका घटनेमुळं वातावरण चिघळलं, पोलिसांची धडक कारवाई
"आमच्या लॉकअप मध्ये मोफत खायला.."
हे प्रकरण इंटरनेटवर व्हायरल झालं आणि #BiryaniIsNotConsent हॅशटॅग ट्रेंड झालं. या हॅशटॅगच्या माध्यमातून लोकांनी असा मेसेज दिला की,कोणत्याही नात्यात किंवा एखाद्या परिस्थितीत परवानगी खूप महत्त्वाची असते. तुम्ही ते पैशांमध्ये आणि अन्य कोणत्याही गोष्टींशी जोडू शकत नाही.अशा लोकांचे विचार खूप खालच्या थराचे आणि विकृती पसरवणारे असतात,असंही काही लोकांनी म्हटलंय.
मुंबई पोलिसांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं,"370 रुपयांमध्ये तुम्हाला एक प्लेट बिर्याणी मिळते. पण आमच्या लॉकअप मध्ये मोफत खायला मिळतं.फक्त दिर्घकाळ वेळ घालवावा लागतो.#BiryaniIsNotConsent” या पोस्टच्या माध्यमातून पोलिसांनी हे समजावण्याचा प्रयत्न केला की,कोणालाही खाण्याच्या बदल्यात त्याच्याकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे आणि परवानगी खूप गरजेची आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world