Urmila Kanetkar : 'तुमचा फोटो देव्हाऱ्यात ठेवायचाय'; उर्मिला कानेटकरने 'असंभव' मालिकेवेळीचा किस्सा केला शेअर

चाहत्याचं ते वाक्य ऐकून उर्मिला गोंधळली, यावर ती त्यांना म्हणाली....

जाहिरात
Read Time: 2 mins

Urmila Kanetkar : मराठी मालिका आणि चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री, शास्त्रीय नृत्यांगणा उर्मिला कानेटकर विविध कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. आदिनाथ कोठारेसोबत घटस्फोटाबाबतही अनेक चर्चा सुरू असतात. दरम्यान उर्मिला कानेकटरने एका मुलाखतीदरम्यान एक किस्सा शेअर केला आहे. अभिनयाच्या करिअरमध्ये आलेला अनुभव तिने यादरम्यान कथन केला. 

“मला ना तुमचा फोटो देव्हाऱ्यात ठेवायचाय”


या मुलाखतीदरम्यान उर्मिला म्हणाली, मी असंभव मालिका करत होते. त्यावेळेला माझी पार्वती नावाची भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. पार्वतीचा स्वभाव आणि गेटअप खूप सोज्वळ आणि सात्विक होता. त्यावेळेला मला एका इव्हेंटला किंवा कुठेतरी गेले असताना मला एक गृहस्थ भेटले. त्यावेळेला स्मार्टफोन वगैरे नव्हते. त्यावेळी चाहते ऑटोग्राफ मागायचे. त्यामुळे त्यांनी मला विचाराल, “तुमचा काही फोटो आहे का तुमच्याकडे जो मला देऊ शकता का?” मला हे खूप विचित्र वाटलं, म्हणून मी त्यांना विचारले, “का हो माझा फोटो का मागतात?” त्यांनी सांगितलं, “मला ना तुमचा फोटो देव्हाऱ्यात ठेवायचाय”.

Advertisement

नक्की वाचा - Kshitij Patwardhan : सचिन पिळगावकरांना ट्रोल करणाऱ्यांना क्षितिजचं सणसणीत उत्तर; सांगितली दुसरी बाजू

तुमचा चेहरा पहिला की माझा दिवस चांगला जाईल

मी विचारलं, “मला पुजणार वगैरे आहात का उद्यापासून? असं काही करू नका, मी काही देव नाही.” ते म्हणाले, “नाही नाही मला काही पूजा वगैरे नाही करायची. तुमचा चेहरा अत्यंत सात्विक आहे. तुमचा फोटो देवाऱ्यात ठेवायचाय. मी सकाळी बाहेर जाताना तुमचा चेहरा पहिला की माझा दिवस चांगला जाईल. ऊर्मिला कोठारेने झी २४ तासला दिलेल्या एका मुलाखतीत चाहत्यासोबतचा हा अनुभव सांगितला आहे.

Topics mentioned in this article