
Singer Pawandeep Rajan Accident News: इंडियन आयडल सीझन 12चा विजेता आणि गायक पवनदीप राजनच्या कारचा भीषण अपघात झाला. सोमवारी (5 मे 2025) झालेल्या अपघातात पवनदीप गंभीर जखमी झाला आहे. अमरोहामध्ये पहाटे 3 वाजेच्या सुमारास पवनदीपच्या कारचा अपघात झाला. घटनस्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी पवनदीपची मदत केली. अपघातग्रस्त कारमधून त्याला बाहेर काढले आणि तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उत्तराखंडहून दिल्लीकडे प्रवास करताना ही घटना घडलीय. पुढील उपचारांसाठी पवनदीपला दिल्लीकडे रवाना करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गायकाच्या पाय आणि हाताला जखम झाली आहे.
(नक्की वाचा: Donald Trump: ट्रम्प यांचा आणखी एक दणका, बॉलिवूड चित्रपट आता टार्गेटवर, काय निर्णय घेतला?)
कसा घडला अपघात?
पवनदीप उत्तराखंडहून दिल्लीकडे जाताना त्याच्या कारचा अपघात झाला. हायवेवर उभ्या असलेल्या ट्रकला त्याच्या कारची जोरदार धडक बसली. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला आहे. गजरौला पोलीस स्टेशन परिसरातील राष्ट्रीय महामार्ग नऊवर ही दुर्घटना घडलीय.
Pahalgam Terror Attack | राखी सावंतकडून जय पाकिस्तानचा नारा; भारतीयांकडून संताप व्यक्त | NDTV मराठी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world