india's got latent वाद प्रकरणात 50 हून अधिक सेलिब्रिटींना समन्स, रणवीर अलाहाबादियाचा फोन मात्र बंद!

राखी सावंत, समय रैनासह 50 नामवंत सेलिब्रेटींना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

india's got latent वाद प्रकरणात आतापर्यंत पाच जणांचे जबाब नोंदविण्यात आले असून महाराष्ट्र सायबर विभागाने पन्नासहून अधिक सेलिब्रेटींना समन्स बजावला आहे.  मुंबई पोलिसांनी रणवीर अलाहाबादियाला तिसरा समन्स (Summons to Ranveer Allahabadia) बजावला आहे. ताबडतोब पोलीस ठाण्यात येऊन जबाब नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याला 10 मार्चपर्यंत हजर राहण्यास आदेश देण्यात आले आहे. मात्र युट्यूबर रणवीर अलाहाबादियाचा फोन बंद असल्यामुळे मुंबई पोलीस त्याचा शोध घेऊ शकले नाहीत, अशी माहिती आहे.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कॉमेडियन समय रैनाला त्याच्या यूट्यूब शोवर केलेल्या वादग्रस्त टिप्पण्यांशी संबंधित प्रकरणातील तपासासंदर्भात 10 मार्चपर्यंत पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितलं आहे. दुसरीकडे आतापर्यंत पाच जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. महाराष्ट्र सायबर विभाग इंडियाज गॉट लेटंटच्या 1 ते 6 सर्व भागांची तपासणी करत आहेत. या प्रकरणी 30 हून अधिक व्यक्तींना आरोपी करण्यात आले आहेत. राखी सावंत, समय रैनासह 50 नामवंत सेलिब्रेटींना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहे.

नक्की वाचा - Ranveer Allahabadia : 'तुझ्या डोक्यात घाण भरली आहे'; रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत वाईट शब्दात फटकारलं!

न्यायालयाने रणवीरला फटकारलं
रणवीर अलाहाबादिया यांच्या टिप्पणीवर नाखूष असलेल्या न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोतीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने रणवीर अलाहाबादियाला कडक शब्दात फटकारलं. ते म्हणाले की, त्याच्या डोक्यात घाण आहे जी त्याने यूट्यूब प्रोग्राममध्ये उधळली होती. सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला त्याच्या असभ्य टिप्पण्यांसाठी फटकारलं. 'ही अश्लीलता नाही तर ते काय आहे? तुमच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर आम्ही रद्द का करावा', असा सवाल न्यायालयाने रणवीरच्या वकिलाकडे उपस्थित केला.  रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून त्याला अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे.
 

Advertisement