Top Taxpayer Celebrities : कर भरण्यात शाहरुख ठरला 'किंग', तर दुसऱ्या क्रमांकावरचं नाव चकित करणारं

करीना कपूर महिला सेलिब्रिटींमध्ये टॉप 10 च्या बाहेर आहे. तिने 20 कोटी रुपयांचा कर भरला आहे. फॉर्च्यून इंडियाने स्पष्ट केले की हे आकडे 2023-24 या आर्थिक वर्षासाठी या सेलिब्रिटींनी अॅडव्हान्स टॅक्स भरण्याच्या आधारावर मोजले आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

सेलिब्रिटींची लाईफस्टाईल, घर, गाड्या याची माहिती जाणून घेण्यास अनेकजण उत्सुक असतात. सेलिब्रिटी किती पैसे कमावतात याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळत नाही. मात्र टॅक्सच्या माध्यमातून त्यांच्या कमाईचा अंदाज लावला जाऊ शकतो. फॉर्च्यून इंडियाची सप्टेंबर 2024 मध्ये सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींची यादी नुकतीच जाहीर केली आहे. ज्यामध्ये शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, विराट कोहली यासारखे सुपरस्टार टॉप 5 मध्ये आहेत. 

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान सप्टेंबरमध्ये प्रथम क्रमांकाचा किताब मिळवून सर्वाधिक कर भरणारा भारतीय सेलिब्रिटी बनला आहे. शाहरुखने 2023-2024 या आर्थिक वर्षात 92 कोटी रुपयांचा कर भरला आहे. शाहरुखने 2023 मध्ये पठाण, जवान आणि डंकी सारखे चित्रपट दिले आहेत. पण 2024 मध्ये त्यांचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. असे असतानाही त्याने सर्वाधिक कर भरल्याचं समोर आलं आहे. 

(नक्की वाचा- Standup Against Street Harassment: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या रायचा 'तो' व्हिडीओ चर्चेत)

शाहरुख खाननंतर थलापती विजयने 80 कोटींचा कर भरत दुसऱ्या नंबरवर आहे. तिसऱ्या क्रमांकावर सलमान खान आहे, ज्याने 75 कोटींचा कर भरला आहे. चौथ्या क्रमांकावर अमिताभ बच्चन आहेत, ज्यांनी 71 कोटींचा कर भरला आहे. तर पाचव्या क्रमांकावर क्रिकेटर विराट कोहली आहे, ज्याने 66 कोटींचा कर भरला आहे. 

याशिवाय, करीना कपूर महिला सेलिब्रिटींमध्ये टॉप 10 च्या बाहेर आहे. तिने 20 कोटी रुपयांचा कर भरला आहे. फॉर्च्यून इंडियाने स्पष्ट केले की हे आकडे 2023-24 या आर्थिक वर्षासाठी या सेलिब्रिटींनी अॅडव्हान्स टॅक्स भरण्याच्या आधारावर मोजले आहेत. 

Advertisement

(नक्की वाचा: AR रहमानच्या घटस्फोटानंतर Grey Divorce का आहे चर्चेत? त्याचं प्रमाण का वाढतंय?)

शाहरुख खानने जानेवारी 2023 मध्ये पठाणसोबत पुनरागमन केले, ज्याने जगभरात 1000 कोटींहून अधिक कमाई केली. यानंतर एटली दिग्दर्शित जवान सिनेमा प्रदर्शित झाला. ज्याने 1150 कोटींची कमाई करून अनेक नवे रेकॉर्ड केले. वर्षाच्या शेवटी राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकी आला. या चित्रपटाने पठाण-जवानसारखी कमाई केली नाही. पण तरीही 400 कोटींहून अधिक कमाई करण्यात सिनेमा यशस्वी ठरली. 

नफ्याचा वाटा आणि कमाई यामुळे शाहरुख जवळपास दशकानंतर भारतातील सर्वाधिक कर भरणारा अभिनेता बनला. त्याचप्रमाणे साऊथचा सुपरस्टार थलापती विजयचा 2023-24 मध्ये मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा रिलीज झाला आहे. ज्याने 600 कोटींहून अधिक कमाई केली. काही रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याला या चित्रपटासाठी 200 कोटी रुपयांहून अधिक मानधन मिळालं होतं. 
 

Advertisement