देशातील सर्वात मोठ्या एअरलाइन्सपैकी एक असलेल्या इंडिगोच्या (IndiGo) व्यवस्थापनातील गोंधळाचा आणि मोठ्या संख्येने विमाने रद्द होण्याचा फटका सामान्य प्रवाशांसह अनेक सेलिब्रिटींनाही बसला. इंडिगोने आतापर्यंत 1000 हून अधिक विमाने रद्द केली आहे. ज्यामुळे हजारो प्रवाशांना मनस्ताप होत आहे.
राहुल वैद्यचा कटू अनुभव
या गोंधळाचे शिकार झालेल्या प्रवाशांमध्ये गायक राहुल वैद्यचाही समावेश आहे. राहुल वैद्य गोव्याहून मुंबईला प्रवास करत होता आणि त्याला त्याच रात्री कोलकाता येथे एका शोसाठी पोहोचायचे होते. त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या संपूर्ण घटनेचा अनुभव शेअर केला आहे. मुंबई-कोलकाता- गोवा प्रवासासाठी त्याला 4 लाखांहून अधिक खर्च आला.

(नक्की वाचा- Indigo Crisis: इंडिगोच्या गोंधळात नवरा-नवरी अडकले! रिसेप्शनमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे लावली हजेरी)
पहिल्या पोस्टमध्ये त्याने आपला थकलेला सेल्फी शेअर केला आणि लिहिले, "प्रवासासाठी आजचा दिवस सर्वात वाईट आहे! आणि आज रात्री आमचा शो कोलकाता येथे आहे... आम्ही तिथे कसे पोहोचणार हे अजूनही माहीत नाही!" त्यानंतर राहुलने दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्याने अनेक बोर्डिंग पासचे फोटो शेअर केले आणि उघड केले की, डोमेस्टिक एअरलाईन तिकिटांसाठी त्याला 4.2 लाख रुपये खर्च करावे लागले. सगळे बोर्डिंग पास हातात घेऊन त्याने आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

निया शर्माचा अनुभव
या गोंधळात अडकलेल्यांमध्ये टीव्ही अभिनेत्री निया शर्माचा देखील समावेश आहे. तिनेही देशांतर्गत विमान प्रवासासाठी 54 हजार रुपये खर्च केल्याचे सांगितले. तिने अनेक पोस्टमध्ये लिहिले, "माझा बोर्डिंग पास 54 हजार रुपयांचा आहे... आणि हा देशांतर्गत प्रवास आहे."
(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar: लग्न करुन घरी निघाले, रस्त्यात चौघांनी कार अडवली अन् डोळ्यासमोर नवरी गायब!)
इंडिगोकडून माफीनामा
इंडिगोने गुरुवारी आपल्या ग्राहकांची माफी मागणारे निवेदन जारी केले आहे. इंडिगोच्या विमाने रद्द होण्याचे प्रमाण दररोज अंदाजे 170 ते 200 पर्यंत वाढले आहे, जे सामान्य प्रमाणापेक्षा खूप जास्त आहे. इंडिगोने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "या घटनांमुळे प्रभावित झालेल्या आमच्या सर्व ग्राहकांची आणि उद्योग भागधारकांची आम्ही मनःपूर्वक माफी मागतो. विलंब आणि गोंधळाचा परिणाम कमी करण्यासाठी आणि लवकरच सामान्य स्थितीत आणण्यासाठी इंडिगोची टीम नागरी उड्डाण मंत्रालय (MOCA), डीजीसीए (DGCA) आणि विमानतळ ऑपरेटरच्या मदतीने परिश्रमपूर्वक काम करत आहे."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world