Paatal Lok 2 Webseries : जयदीप अहलावत, (Jaideep Ahlawat) अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांची प्रमुख भूमिका असलेली 'पाताल लोक' (Paatal Lok Season 2) ही वेबसिरीज प्रचंड हिट झाली होती. अत्यंत थरारक आणि शेवटच्या भागापर्यंत उत्कंठा वाढवत नेणाऱ्या या वेबसिरीजमध्ये अश्वाक सिंग, गुल पनाग, तिलोत्तमा शोम, नागेश कुकनूर आणि जाहनू बारूआ यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारली होती. अमेझॉन प्राईवर प्रसिद्ध झालेल्या या वेबसिरीजच्या दुसऱ्या भागाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. हा दुसरा भाग कधी प्रसिद्ध होणार याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
Gates open this new year 🔥#PaatalLokOnPrime, New season, Jan 17 pic.twitter.com/gUVdgaxeKa
— prime video IN (@PrimeVideoIN) December 23, 2024
'पाताल लोक'च्या पहिल्या भागाचे यश हे कथेचं उत्तमरितीने पटकथेमध्ये झालेले रुपांतर आणि ही पटकथा जिवंत करणाऱ्या अभिनेत्यांचे होते. या वेबसिरीजचे पटकथा लेखक सुदीप शर्मा यांनी म्हटले की, "पाताल लोकच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत. पहिला भाग प्रेक्षकांना खूप आवडला होता आणि त्याचे कौतुकही झाले होते. शर्मा यांनी म्हटले की, पाताल लोक'ला मिळालेल्या यशामुळे नव्या कथा, लोकांशी जोडल्या गेलेल्या गोष्टी आणि उत्कटतेने या कथा सांगण्याची पद्धत लोकांना आवडल्याचे दिसून झाले. अमेझॉनमुळे या वेबसिरीजला एक चांगला मंच मिळाला आणि ही मालिका कोट्यवधी लोकांर्यंत पोहोचण्यास मदत झाल्याचेही शर्मा यांनी म्हटले आहे. पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग हा अधिक गूढ, थरारक आणि उत्कंठावर्धक असेल असे शर्मा यांचे म्हणणे आहे.
Using our hammer to break the internet 🔨⚠️#PaatalLokOnPrime, New Season, Coming Soon pic.twitter.com/Se16CZU30B
— prime video IN (@PrimeVideoIN) December 13, 2024
कादंबरीवर आधारीत मालिका
पाताल लोक मालिका ही तरुण तेजपाल यांनी लिहिलेल्या 'द स्टोरी ऑफ माय असासिन्स' या कादंबरीवर आधारीत होती. हाथी राम हा या मालिकेतील मुख्य पात्र असून तो पोलीस अधिकारी असतो. जयदीप अहलावत याने हाथी रामची भूमिका साकारली होती. हाथीराम हा एकही मोठी केस सोडवू न शकलेला सर्वसाधारण अधिकारी असतो. एका वृत्तवाहिनीच्या संपादकाची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा कट रचल्याप्रकरणी हाथीराम हा काही आरोपींना अटक करतो. यानंतर अत्यंत थरारक घटना उलगडण्यास सुरुवात होते. पहिल्या भागात जयदीप अहलावत आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या भूमिकांचे विशेष कौतुक करण्यात आले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world