लेन्सने वाट लागली, अभिनेत्रीचा डोळा थोडक्यात वाचला; असह्य वेदना अन् दिसणे बंद झाल्याने झाली हैराण

Jasmin Bhasin : 17 जुलै रोजी जॅस्मिन दिल्लीला एका कार्यक्रमासाठी गेली होती. या कार्यक्रमासाठी लेन्स घात्यानंतर जॅस्मिनला त्रास व्हायला सुरुवात झाली.

Advertisement
Read Time: 2 mins

अभिनेत्री जॅस्मिन भसीनला एका डोळ्याने दिसणे बंद झाले आहे. डॉक्टरांनी तिच्या डोळ्याला पट्टी बांधली असून तिला मरणप्राय वेदना सहन कराव्या लागत आहेत. एका लेन्समुळे हे सगळं झाल्याचं कळतं आहे. 

मागील 4-5 दिवसांपासून जॅस्मिनला दिसत नसून तिला भयंकर वेदना सहन कराव्या लागत आहेत. या वेदनांमुळे तिला धड झोपही लागत नाहीये. 17 जुलै  रोजी जॅस्मिन दिल्लीला एका कार्यक्रमासाठी गेली होती. या कार्यक्रमासाठी लेन्स घातल्यानंतर जॅस्मिनला त्रास व्हायला सुरुवात झाली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लेन्स घातल्यानंतर जॅस्मिनला त्रास व्हायला लागला होता. तिचा डोळा दुखायला लागला आणि हे दुखणं वाढतच चाललं होतं. नियोजित कार्यक्रमामुळे आपल्याला वेळीच डॉक्टरकडे जाता आलं नाही असं तिने म्हटलंय. या कार्यक्रमामध्ये आपल्या डोळ्याचं दुखणं कोणाला कळू नये यासाठी तिने गॉगल घालून कार्यक्रमाला हजेरी लावली. 

(नक्की वाचा -  अभिषेक बच्चनची एक कृती आणि पुन्हा सुरु झाली ऐश्वर्यासोबतच्या मतभेदांची चर्चा)

जॅस्मिनने म्हटलंय की काही वेळानंतर मला अंधत्व आलं, मला काहीच दिसत नव्हतं. जॅस्मिनने त्या रात्री दिल्लीतल्याच डोळ्यांच्या डॉक्टरांकडे धाव घेतली. त्यांनी सांगितले की तिच्या डोळ्याला आतून जबरदस्त इजा पोहोचली आहे. 

Advertisement

(नक्की वाचा - "कुणाशी तरी आघाडी करुन तुम्ही विकलात हा भगवा रंग...",  रोख कुणाकडे? 'धर्मवीर 2'च्या डायलॉगची चर्चा)

डॉक्टरांनी तिच्या डोळ्याला पट्टी लावली. दुसऱ्या दिवशी जॅस्मिन मुंबईला आली आणि तिने येऊन उपचाराला सुरुवात केली. डॉक्टरांनी तिला सांगितले की तिला आराम पडायला 4-5 दिवस लागतील. वेदनेमुळे मला रात्री झोपताही येत नाही असं जॅस्मिनने म्हटलंय.
 

Topics mentioned in this article