Shefali Jariwala Passed Away: 'कांटा लगा...' गर्ल शेफाली जरीवालाचं निधन, 42 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shefali Jariwala Passed Away: शेफाली तिचा पती पराग त्यागीसोबत येथे मुंबईतील अंधेरी लोखंडवाला राहत होती. शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तिची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Shefali Jariwala Passed Away:  'कांटा लगा...' या प्रसिद्ध गाण्यामुळे रातोरात स्टार बनलेली शेफाली जरीवाला हिचं वयाच्या 42 व्या वर्षी निधन झाले आहे. शुक्रवारी सकाळी अचानक छातीत दुखू लागल्याने तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शेफालीच्या निधनाची बातमी कळताच चाहत्यांमध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. सेलिब्रिटी आणि चाहते सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली वाहत आहेत.

शेफाली तिचा पती पराग त्यागीसोबत येथे मुंबईतील अंधेरी लोखंडवाला राहत होती. शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तिची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पराग तिला जवळच्या बेलेव्ह्यू रुग्णालयात घेऊन गेला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी शेफालीला मृत घोषित केले.

Advertisement

ज्येष्ठ सिने पत्रकार विक्की लालवानी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये शेफालीच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी असेही म्हटले आहे की, त्यांनी याबद्दल अधिक माहितीसाठी रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर विजय लुल्ला यांच्याशी संपर्क साधला. परंतु त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. रुग्णालयाचे दुसरे डॉक्टर डॉ. सुशांत यांनी अभिनेत्रीच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. शेफालीचा मृतदेह आता कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, जिथे पोस्टमार्टम प्रक्रिया सुरू आहे.

कोण होती शेफाली जरीवाला?

शेफाली जरीवालाचा जन्म गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला होता.2002 मध्ये आलेल्या 'कांटा लगा' या गाण्याच्या रीमिक्स व्हिडिओमुळे ती प्रसिद्ध झाली होती. या गाण्याच्या लोकप्रियतेनंतर लोक तिला 'कांटा लगा गर्ल' म्हणून ओळखू लागले. त्यावेळी या गाण्याबद्दल काही वादही झाले होते. शेफाली बिग बॉस 14 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. तिथेही तिने बरीच लोकप्रियता मिळवली.