Kajol devgan: ना एफडी ना सेव्हिंग! तरी काजोलला HDFC बँक देणार दरमहा 6 लाख रूपये, कारण जाणून म्हणाल...

काजोलने अभिनया बरोबर साईड बिझनेसमध्ये ही काही ना काही केलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

आघाडीची अभिनेत्री काजोल नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मग तो तिचा अभिनय असो की तिचं गोव्यातलं रिसॉर्ट असो. काजोलने अभिनया बरोबर साईड बिझनेसमध्ये ही काही ना काही केलं आहे. सध्या ती तिच्या रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीमुळे चर्चेत आहे. काजोलने मुंबईतील गोरेगाव परिसरातील तिच्या मालकीची एक मोठी व्यावसायिक जागा (Commercial Property) देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या HDFC बँकेला भाडेतत्त्वावर दिली आहे. या बँके सोबत तिने 9 वर्षांचा करारा केला आहे. त्यातून तिला भली मोठी रक्कम मिळणार आहे. 

या करारा पोटी काजोल देवगणला  एकूण 8 कोटी 60 लाख रुपयांची मोठी कमाई होणार आहे. विशेष म्हणजे काजोलचे HDFC बँकेत कोणतेही खाते नाही. किंवी तिने या बँकेत एफडी ही केलेली नाही. सेव्हिंग ही नाही. तरी ही बँक तिला आता दर महिन्याला मोठी रक्कम देणार आहे. हे सर्व भाडे कराराच्या माध्यमातून होणार आहे. जे भाडे करार झाला आहे त्यानुसार काजोलला दरमहा भाड्यापोटी 6 लाख 90 हजार रुपये मिळणार आहे.  

Advertisement

नक्की वाचा - Twinkle khanna: 'या' आजाराने त्रस्त आहे अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना, म्हणाली 'आता जीवन कठीण झाले आहे...'

जी जागा काजोलने भाड्याने दिली आहे ती मालमत्ता गोरेगावमध्ये आहे. 'भरत अराईस'इमारतीत हा मोठा कमर्शिअल गाला आहे. काजोलने ही 1817 स्क्वेअर फूटची मालमत्ता मार्च 2025 मध्ये खरेदी केली होती. त्याची किंमत 28 कोटी 78 लाख रुपये होती. तेवढ्या किंमतीला तिने विकत घेतली होती. सध्या तिने HDFC बँकेसोबत 9 वर्षांचा करार केला होता. कराराची तारीख ही 14 नोव्हेंबर 2025 आहे. 

नक्की वाचा - Suraj Chavan: घोडा उधळला, फेटा पडला, सूरज चव्हाण कसा सावरला, वरातीत काय घडलं? पाहा VIDEO

सुरक्षा ठेव (Security Deposit) म्हणूनही बँकेने काही रक्कम काजोलला दिली आहे.  बँकेने काजोलला 27.61 लाख रुपये सुरक्षा ठेव म्हणून दिले आहेत. यासाठी किती स्टॅम्प ड्युटी लागली ते ही पाहूयात. करारासाठी 5.61 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली आहे. या करारामध्ये दर तीन वर्षांनी भाड्यामध्ये वाढ करण्याची अट समाविष्ट आहे. त्यानुसार पहिली 3 वर्षे: दरमहा भाडे  6 लाख 90 हजार रुपये दिले जाणार आहे. त्यानंतर  पुढील 3 वर्षे: भाड्यात 15% वाढ होईल त्यानुसार  मासिक भाडे 7 लाख 99 हजार रुपये असेल.  शेवटची 3 वर्षे पुन्हा 15% वाढ होईल. त्यानुसार मासिक भाडे 9 लाख 13 हजार रुपये असेल. 

नक्की वाचा - Suraj Chavan marriage: जान्हवी किल्लेकरने सूरजला दिलं लग्नाचं भन्नाट गिफ्ट!,'त्या' महागड्या गिफ्टची चर्चा का?


Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world