जाहिरात

Twinkle khanna: 'या' आजाराने त्रस्त आहे अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना, म्हणाली 'आता जीवन कठीण झाले आहे...'

महिलांमध्ये ही समस्या साधारणपणे 45 ते 55 या वयोगटात येते. या काळात महिलांचे सुख-समाधान पूर्णपणे बिघडून जाते.

Twinkle khanna: 'या' आजाराने त्रस्त आहे अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना, म्हणाली 'आता जीवन कठीण झाले आहे...'
मुंबई:

अभिनेत्री आणि अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना आता एक लेखिका म्हणून आपले करिअर यशस्वीपणे पुढे नेत आहे. ती आपले मत ठामपणे मांडते आणि महिलांशी संबंधित महत्त्वाच्या समस्यांवर बोलण्यास मागे हटत नाही. नुकतेच, ट्विंकल  महिलांमध्ये आढळणाऱ्या मेनोपॉज (Menopause) या समस्येवर खुलेपणाने भाष्य केले. मेनोपॉज म्हणजे अशी स्थिती, ज्यात महिलेचा मासिक पाळी (Periods) अनियमित होते किंवा पूर्णपणे थांबते. महिलांमध्ये ही समस्या साधारणपणे 45 ते 55 या वयोगटात येते. या काळात महिलांचे सुख-समाधान पूर्णपणे बिघडून जाते.

ट्विंकल खन्ना यांना ही तिच समस्या
ट्विंकल खन्ना यांनी आपल्या नवीन कॉलममध्ये याच विषयावर लिहिले आहे. त्यांनी आपल्या या कॉलमला 'दर्द-ए-डिस्को और नया मेनोपॉज रीमिक्स' असे नाव दिले आहे. ट्विंकल म्हणाल्या, 'मला नेहमी वाटायचे की 50 वर्षांची झाल्यावर जीवनाला खरे स्वरूप मिळेल, पण तसे नाही. यात हार्मोन्स कमी होतात आणि डोळ्यांची दृष्टी कमजोर होते. पहाटेचे 3 वाजलेले असतात, अंधार असतो. ही वेळ असायला हवी होती जेव्हा मुले घरातून बाहेर पडतात. पण माझ्या हार्मोन्सने जणू दमच तोडला आहे. मी फक्त खिडकीतून लुकलुकणारे तारे बघत बसते. असं तिने म्हटलं आहे. 

नक्की वाचा - Pankaja Munde PA: पत्नीच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जेचा पहिला फोन पंकजा मुंडेंना, चर्चा काय झाली?

टू मच विथ काजोल अँड ट्विंकल
नुकत्याच आलेल्या 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' (Too Much With Kajol and Twinkle) या शोमध्ये ट्विंकल बोलत होती. मेनोपॉज महिलांचे जीवन खूप कठीण बनवतो. ती  म्हणाली की, 'मी थकलेली आहे, त्याच वेळी उत्साही आहे, सावध आहे, मला जास्त उष्णता आणि चिपचिपाटाचा अनुभव येत आहे.' हा एका महिलेसाठी कठीण काळ असतो. पण त्यातूनही सावरायचं असतं असं ती यावेळी म्हणाली. 

नक्की वाचा - D Mart News: डी मार्टमध्ये 'या' दिवशी मिळतं सर्वात स्वस्त सामान, त्यामागचं कारणं ऐकून तुम्ही ही खूश व्हाल

ट्विंकलमध्ये आलेले हे शारीरिक बदल

ट्वींकलने पुढे सांगितले की, या समस्येमुळे तिच्यात अनेक बदल झाले आहेत. ज्यात हाडांमध्ये वेदना होणे, रात्री घाम येणे आणि त्वचा पातळ होणे यांचा समावेश आहे. ट्विंकलने सांगितले की, पुरुषांना हार्मोनल असंतुलनाशी (Hormonal Imbalance) झगडावे लागत नाही, म्हणून तिला त्यांचा हेवा वाटतो. पण या त्रासातूनही महिला बाहेर पडतात. असं ही ती सांगायला यावेळी विसरली नाही. आपण ही यातून बाहेर येत आहे. 

नक्की वाचा - Shocking news: 3 मुलांची आई प्रियकरापासून गरोदर राहीली, त्यानंतर तिचा 'तो' एक हट्ट अन् शेतातच...

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com