Lokah Chapter 1: Chandra Box Office Collection: नव्या दाक्षिणात्य चित्रपटाने घातलाय धूमाकूळ

Lokah Chapter 1: हा चित्रपट सुपरहिरो चित्रपट असून या चित्रपटाची कथा चंद्रा नावाच्या तरुणीभोवती फिरते

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Lokah Chapter 1: कल्याणी प्रियदर्शनचा 'लोकह चॅप्टर 1: चंद्रा' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. 28 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने कमी वेळातच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, पहिल्या वीकेंडमध्ये घसघशीत कमाई केल्यानंतर, चित्रपटाने सोमवारच्या कमाईतही ₹6.65 कोटी मिळवले, ज्यामुळे एकूण कमाई ₹30 कोटींच्या पुढे गेली आहे.

नक्की वाचा: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब या स्टारसोबत रिलेशनशिपमध्ये? नेटकऱ्यांचा प्रश्न

Lokah Chapter 1: लोकाह चित्रपटाने किती कमाई केलीय? 

  1. पहिला दिवस (गुरुवार): ₹2.7 कोटी
  2. दुसरा दिवस (शुक्रवार): ₹4 कोटी
  3. तिसरा दिवस (शनिवार): ₹7.6 कोटी
  4. चौथा दिवस (रविवार): ₹10.1 कोटी
  5. पाचवा दिवस (सोमवार): ₹6.65 कोटी (अंदाजे)

या आकडेवारीनुसार, 'लोकह चॅप्टर 1: चंद्रा'ने आतापर्यंत ₹31.5 कोटींचा गल्ला जमवला आहे. वीकेंडमध्ये मोठी कमाई केल्याने सोमवारची घसरण नैसर्गिक असली तरी, चित्रपटाची एकूण कामगिरी मजबूत आहे.

नक्की वाचा: रेस्टॉरंटमध्ये भांडी घासली, रस्त्यावर कॉस्मेटिक विक्री; आता आहे टीव्हीची Highest Paid अभिनेत्री 

Lokah Chapter 1: 'लोकाह' चित्रपटाला कसा मिळतोय प्रतिसाद?

पहिल्या सोमवारच्या ऑक्युपन्सीमध्ये थोडी घट झाली. ती 75.25% वरून 50.20% पर्यंत खाली आली. पण, दिवसाच्या शेवटी ती वाढताना दिसली. सकाळच्या शोजमध्ये 44.02% ऑक्युपन्सी होती. दुपारच्या शोजमध्ये 47.07% आणि संध्याकाळच्या शोजमध्ये 50.26% ऑक्युपन्सी झाली. रात्रीच्या शोजमध्ये सर्वाधिक 59.43% ऑक्युपन्सी नोंदवली गेली. या आकडेवारीवरून प्रेक्षक अजूनही चित्रपटाला पसंती देत असल्याचे दिसते.

Lokah Chapter 1 Story: 'लोकाह' चित्रपटाची कथा नेमकी काय आहे ?

या चित्रपटाची कथा 'चंद्रा' नावाच्या तरुणीच्या अवतीभोवती फिरते. न्यायासाठी लढणारी ही तरुणी दाखवण्यात आली आहे. या प्रयत्नात तिची गाठ काही भरकटलेल्या तरुणांशी आणि एका कर्तव्यकठोर पोलीस अधिकाऱ्याशी होते. फार चर्चेत न राहण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही या तरुणीपुढे अडचणी निर्माण होतात. 

Advertisement

Lokah Chapter 1 Story: पाहा 'लोकाह' चित्रपटाचा ट्रेलर

कल्याणी प्रियदर्शन कोण आहे ? (Who is Kalyani Priyadarshan)

कल्याणी प्रियदर्शन ही प्रसिद्ध चित्रपट निर्माता प्रियदर्शन यांची मुलगी आहे. तिने केवळ अभिनयातच नाही, तर आपल्या वडिलांप्रमाणेच चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'लोकह चॅप्टर 1: चंद्र' या चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.