जाहिरात

रेस्टॉरंटमध्ये भांडी घासली, रस्त्यावर कॉस्मेटिक विक्री; आता आहे टीव्हीची Highest Paid अभिनेत्री 

अभिनय जगतात असे स्टार असतात जे आपल्या कामाने चाहत्यांवर मोठी छाप सोडतात. यातील एक आहे टीव्हीची स्टार क्वीन...

रेस्टॉरंटमध्ये भांडी घासली, रस्त्यावर कॉस्मेटिक विक्री; आता आहे टीव्हीची Highest Paid अभिनेत्री 
टीव्हीची स्टार क्वीन...
नवी दिल्ली:

Highest Paid Actress : अभिनय जगतात असे स्टार असतात जे आपल्या कामाने चाहत्यांवर मोठी छाप सोडतात. यातील एक नाव आहे टीव्हीची स्टार अभिनेत्री स्मृती इराणी. सध्या स्मृती आपल्या कल्ट क्लासिक टीव्ही शो 'क्योंकी सास भी कभी बहू थी' पार्ट दोनमध्ये पाहायला मिळत आहे. या मालिकेतील तुलसी विरानीची भूमिका घराघरात लोकप्रिय झाली. मात्र एक वेळ अशी होती, जेव्हा त्यांनी रस्त्यावर कॉस्मेटिकचं सामान विकलं आणि रेस्टॉरंटमध्ये भांडी घासली. मात्र अभिनेत्री मागे हटली नाही. आज त्यांचा समावेश टीव्हीच्या हायपेड अभिनेत्रींच्या (Smriti Irani Highest Paid Actress) यादीत आहे. 

आई-वडिलाशी केला संघर्ष

स्मृती इराणीने एका पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की, मी अशा कुटुंबातील आलेय, जिथं आर्थिक चणचण होती. मी अशा संघर्षांमधून आलेय जिथे लोक यशस्वी होत नाहीत आणि मला माहीत आहे की, त्यांच्या खिशात फक्त 100 रुपये असताना जीवन समजून घेणे आणि आपल्या सर्वांची काळजी घेणे किती कठीण असेल. माझे वडील आर्मी क्लबच्या बाहेर पुस्तकं विकायचे. मी त्यांच्यासोबत बसायचो आणि माझी आई घरोघरी जाऊन मसाले विकायची. माझे वडील फारसे शिकलेले नव्हते.  माझ्या आईने पदवीपर्यंत शिक्षण घेतलं होतं. 1976 मध्ये दिल्लीत जन्मलेल्या स्मृतीचे संगोपन पंजाबी आणि महाराष्ट्रीय वडील आणि बंगाली आईने केले. ती तीन बहिणींमध्ये मोठी आहे.

हॉलीवूडच्या सिनेमात 10 वर्षांपूर्वी छोटासा रोल, आजही या बॉलीवूड अभिनेत्याला मिळतायेत पैसे

नक्की वाचा - हॉलीवूडच्या सिनेमात 10 वर्षांपूर्वी छोटासा रोल, आजही या बॉलीवूड अभिनेत्याला मिळतायेत पैसे

1800 रुपये पगारावर केलं काम

घरातील गरीबीमुळे स्मृतीला कॉलेज सोडावं लागलं. यानंतर तिने मॅकडॉनल्डमध्ये 1800 रुपये महिना पगारावर क्लीनरचं काम सुरू केलं होतं. मात्र यापूर्वी तिने मिस इंडिया पेजेंटमध्ये भाग घेतला होता आणि अंतिम फेरीत पोहोचली होती. यासाठी त्यांना घरातल्यांकडून एक लाख रुपये उधार घेतले होते. या स्पर्धेनंतर स्मृती इराणीने एअर हॉस्टेसमध्ये नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र चांगली पर्सनॅलिटी नसल्याचं कारण सांगून तिला मुलाखतीतून  रिजेक्ट करण्यात आलं होतं. 

टीव्हीवर मिळाला पहिला ब्रेक

मात्र इतक्या अपयशानंतरही स्मृती इराणी चिकाटीने अभिनयाचं ऑडिशन देत होती. यानंतर तिला हम पाच या मालिकेत स्विटीची भूमिका मिळाली. यानंतर एकता कपूरच्या आईने स्मृती इराणीला या मालिकेत पाहिलं आणि तिने संधी देण्यास एकताकडे शिफारस केली. 2000 मध्ये स्मृती इराणी क्योंकि सास भी कभी बहु थीमध्ये तुलसी विरानीच्या प्रमुख भूमिकेत दिसली. यानंतर स्मृती इराणी यांनी राजकारणातही चमक दाखवली आणि केंद्रीय मंत्रीही झाल्या. लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर त्या पुन्हा टीव्हीवर आल्या आहेत. आता त्या क्योंकी सास भी कभी बहू थी पार्ट 2 मध्ये काम करीत आहेत. तेथे त्या एका एपिसोडसाठी 14 लाख रुपये चार्ज करते. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com