अभिनेत्री स्माइली सुरी यांनी 2005 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट कलयुगमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं आणि पहिल्याच चित्रपटातून तिने चाहत्यांच्या मनात घर केलं होतं. अहान पांडे आणि अनीत पड्डाच्या सैय्यारा चित्रपटात स्माइलीने रेणुकाची भूमिका निभावली होती. या चित्रपटात कुणाल खेमू आणि इम्रान हाशमीसोबतची जोडी लोकांना आवडली होती. विशेषत: 'जिया धड़क धड़क जाए' गाणं आजही लोकांच्या आवडत्या गाण्यांच्या यादीत आहे. मात्र गेल्या 20 वर्षात तिच्यात मोठा बदल झाला आहे. या १० फोटो पाहून तिला ओळखणंही झालं कठीण.
भट्ट कुटुंबाशी जवळीक असलेली स्माइली सुरी, प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांची भाची, आलिया भट्ट आणि पूजा भट्ट आणि इमरान हाशमी याची चुलत बहीण आहे.
भट्ट कुटुंबाशी जवळचे संबंध असतानाही याचा परिणाम तिच्या करिअरवर पडला नाही. 'कलयुग' मधील यशानंतर स्माइलीला चांगलं काम मिळण्याची अपेक्षा होती, मात्र तिला टाइपकास्ट करण्यात आलं.
स्माइली सूरीला अधिकांश 'कलयुग'मधील रेणुकाच्या जवळपास जाणाऱ्या भूमिका मिळाल्या, त्या तिने रिजेक्ट केल्या नाही.
यानंतर तिने 'ये मेरा इंडिया' आणि 'क्रूक' सारख्या चित्रपटात छोट्या भूमिका साकारल्या. मात्र बॉक्स ऑफिसवर हे चित्रपट फारशी कामगिरी करू शकले नाही.
यानंतर स्माइलीने टेलिव्हिजनवर नशीब आजमावलं. त्यांनी 'जोधा अकबर' आणि रियॅलिटी शो 'नच बलिए 7' मध्ये भाग घेतला. मात्र तिच्या करिअरने गती घेतली नाही.
स्माइलीच्या खासगी जीवनात अनेक चढ-उतार आले. 2014 मध्ये डान्सर विनीत बंगेरासोबत तिचं लग्न झालं, मात्र दोन वर्षातच ते वेगळे झाले.
याशिवाय, तिच्या वडिलांच्या आणि आजीच्या निधनामुळे ती नैराश्यात गेली होती. तिने एका मुलाखतीत सांगितलं की, ती नैराश्याने आणि आघाताने ग्रस्त होती. ज्यामुळे तिच्या कारकिर्दीवर परिणाम झाला.
कठीण काळात स्माइलीने पोल डान्सिंग सुरू केलं होतं. ज्यामुळे तिच्या जीवनाला नवी दिशा मिळाली. ती पोल डान्सिंग शिकली, आता ती पोल डान्सिंग शिकवते.
पोल डान्सिंगने तिला मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या मजबूत केलं आणि नैराश्यातून बाहेर येण्यास मदत केली, असा स्माइलीचा अनुभव आहे. ती सोशल मीडियावर नियमितपणे पोल डान्सिंगबाबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते.