'सन्नी संस्कारी की तुलसी कुमारी' वर 'कांतारा' भारी पडणार ? ॲडव्हान्स बुकींगचे आकडे आले

Kantara Chapter 1 vs Sunny Sanskari Ki Tulsi Kumari: कांतारा चॅप्टर 1 तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि तमिळ भाषेत डब करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Dussehra 2025 Box Office Clash: विजयादशमीला म्हणजेच गुरुवार, 2 ऑक्टोबर रोजी दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.  ब्लॉकबस्टर 'कांतारा'चा प्रीक्वल 'कांतारा चॅप्टर 1' दसऱ्याला प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी प्रदर्शित होणारा वरुण धवन आणि जान्हवी कपूरची प्रमुख भूमिका असलेला 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या चित्रपटाचे 'कांतारा चॅप्टर 1' पुढे आव्हान असणार आहे.  या दोन्ही चित्रपटांसाठी ॲडव्हान्स बुकींगला सुरूवात झाली आहे. ॲडव्हान्स बुकींगच्या आकड्यांवरून कोण चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवणार याची स्पष्ट कल्पना येऊ लागली आहे. 

नक्की वाचा: कांतारामध्ये राणीची भूमिका साकारणारी ही सुंदरी कोण?

'कांतारा चॅप्टर 1' ची सोशल मीडियावर क्रेझ (Kantara Chapter 1 Advance Booking)

सोशल मीडियावर 'कांतारा चॅप्टर 1' (Kantara Chapter 1) बद्दल प्रचंड क्रेझ दिसते आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्येही त्याचे प्रतिबिंब दिसू लागले आहे. हा चित्रपट मूळ कन्नड भाषेतला असून तो तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि तमिळ भाषेत डब करण्यात आला आहे.  भाषेनुसार या चित्रपटाचे किती ॲडव्हान्स बुकिंग झालंय ते पाहूया

  1. कन्नड- 5 कोटी 42 लाख 17 हजार 531 रुपये 
  2. तेलुगू- 3 लाख 52 हजार 707 रुपये 
  3. हिंदी- 89 लाख 73 हजार 383 रुपये 
  4. तमिळ-5 लाख 23 हजार 976 रुपये 
  5. मल्याळम- 31 लाख 22 हजार 123 रुपये 
  6. सर्व भाषा मिळून - 6 कोटी 72 लाख रुपये.

ही आकडेवारी 30 सप्टेंबरपर्यंतची असून सर्व भाषांमध्ये या चित्रपटासाठी चांगलं ॲडव्हान्स बुकिंग झाल्याचे दिसते आहे. 

'सन्नी संस्कारी की तुलसी कुमारी'ची काय अवस्था आहे?  (Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Advance Booking)

कांताराच्या तुलनेत वरुण-जान्हवीची प्रमुख भूमिका असलेला 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' ची अवस्था ॲडव्हान्स बुकिंगमध्ये फारच पातळ असल्याचे दिसते आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपटाने 30 सप्टेंबरपर्यंत 57 लाख 59 हजार रुपयांची कमाई केली आहे. 'कांतारा चॅप्टर 1' चे बजेट 125 कोटी रुपये आहे तर 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चे बजेट सुमारे 80 कोटी रुपये आहे.