
कन्नड चित्रपट 'कांतारा'ने कन्नडसोबच इतर भाषांमध्येही चांगली कामगिरी केली होती. याच चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता रिषाब शेट्टी याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. या यशामुळे या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाचे आणखी काही भाग प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार Kantara Chapter 1 हा चित्रपट तयार झाला असून तो प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा पहिला ट्रेलरे प्रसिद्ध झाला असून सिनेरसिकांना तो आवडताना दिसतोय.
नक्की वाचा: जॅकलिनला मोठा धक्का, 200 कोटी फसवणूक प्रकरणात दिलासा नाहीच!
Kantara: Chapter 1 चा ट्रेलर पाहा
कोण आहे कांतारातील कनकावती?
कांतारा चित्रपटामध्ये रिषाब शेट्टीसोबत रुक्मिणी वसंत ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कनकावतीचे पात्र साकाराणारी रुक्मिणी ही 28 वर्षांची असून तिने 2019 साली अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. अवघ्या काही वर्षातच तिने आपला अभिनयाने सिनेसृष्टीला दखल घ्यायला लावली आहे. कांतारापाठोपाठ तिला अभिनेता यश याची प्रमुख भूमिका असलेल्या 'टॉक्सिक' आणि प्रशांत नील-ज्युनियर एनटीआरचा चित्रपट 'ड्रॅगन'मध्ये प्रमुख भूमिका मिळाली आहे.
शहीद कर्नल यांची कन्या आहे रुक्मिणी
कन्नड, तमिळ आणि तेलुगू सिनेमामध्ये रुक्मिणी वसंतने आपल्या अभिनयाने सिनेरसिकांची अल्पावधीत मने जिंतली आहे. फार कमी लोकांना माहिती आहे की कन्नड कुटुंबात जन्मलेल्या या अभिनेत्रीचे वडील शहीद कर्नल वसंत वेणुगोपाल होते. अशोक चक्र विजेते वसंत वेणुगोपाल हे देशाचे रक्षण करत असताना शहीद झाले होते. 2007 साली जम्मू आणि काश्मीरमधील उरी येथे भारत-पाकिस्तान सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न सुरू होता, हा प्रयत्न हाणून पाडत असताना ते शहीद झाले होते.
नक्की वाचा: Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: बिग बॉस फेम सुरज चव्हाणचं लग्न ठरलं, कोकण हार्टेड गर्ल म्हणाली..
'Kantara:Chapter 1' 2 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
'कांतारा' कमी बजेटमध्ये तयार करण्यात आलेला चित्रपट होता मात्र त्याने केलेल्या कमाईचे आकडे हे निर्मिती खर्चापेक्षा कित्येकपटीने जास्त होते. रिषाब शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनित 'कांतारा: चॅप्टर 1' हा चित्रपट येत्या 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. 2 ऑक्टोबरला दसरा आणि गांधी जयंती आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध झाला असून यामध्ये हंटर चित्रपटामुळे (Hunterrr Movie) प्रकाशझोतात आलेला गुलशन देवय्या याचीही प्रमुख भूमिका असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटात रिषाब शेट्टीची अभिनेत्री कोण आहे याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
पहिल्या भागाने केली होती 400 कोटींची कमाई
यापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'कांतारा'चा Kantara: Chapter 1 हा 'प्रीक्वेल' (पूर्वार्ध) आहे. 'भूत कोला'ही परंपरा कशी सुरू झाली याचा माग घेण्याचा चित्रपटाद्वारे प्रयत्न करण्यात आला आहे. जंगल, त्यातील रहस्ये, राजा आणि जंगलातील भूमीपुत्रांमधील संघर्ष असा या चित्रपटाचा गाभा आहे. चित्रपटाचा ट्रेलर हा कांताराच्या पुढील भागाची उत्सुकता वाढवणारा ठरताना दिसत असून रसिकांच्या प्रतिक्रियाही चांगल्या उमटताना दिसत आहेत. कांताराचा पहिला भाग 16 कोटी रुपये खर्चुन बनविण्यात आला होता. त्या चित्रपटाने जगभरात 400 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. या चित्रपटामध्ये रिषाब शेट्टी जयराम, रुक्मिणी वसंत गुलशन देवैया प्रमुख भूमिकेत असून चित्रपटाचे संगीत बी. अजनीश लोकनाथ यांनी दिले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world