Sunjay Kapur Death: एका मधमाशीमुळे अनर्थ घडला, संजय कपूर यांच्या मृत्यूचे धक्कादायक कारण समोर

वयाच्या 56 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत असतानाच संजय कपूर यांच्या निधनाचे धक्कादायक कारण आता समोर आले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Sanjay Kapoor Death Reason: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूर यांच्या निधनाने सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. इंग्लडमध्ये वास्तव्यास असलेल्या संजय कपूर यांचा पोलो खेळता खेळताच हार्ट अटॅकने दुर्दैवी मृत्यू झाला. वयाच्या 56 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत असतानाच संजय कपूर यांच्या निधनाचे धक्कादायक कारण आता समोर आले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार,  बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे माजी पती संजय कपूर यांचे 12 जूनरोजी इंग्लंडमध्ये वयाच्या 53 व्या वर्षी निधन झाले. हा दुःखद प्रसंग घडला जेव्हा ते त्यांचा आवडता खेळ पोलो खेळत होते. हृदयविकाराचा झटका हे त्यांच्या मृत्यूचे असल्याचे सांगितले जाते. मात्र आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय कपूर इंग्लंडमधील प्रतिष्ठित गार्ड्स पोलो क्लबमध्ये पोलो सामना खेळत होते. खेळादरम्यान त्यांच्या तोंडात एक मधमाशी गेल्याचे मानले जाते, ज्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.

त्यानंतर संजय यांनी तात्काळ खेळ थांबवण्याची विनंती केली आणि मैदानाबाहेर गेले. परंतु त्यानंतर लगेचच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तातडीने वैद्यकीय मदत देऊनही त्यांना वाचवता आले नाही. या दुर्घटनेवर अनेकांनी शोक व्यक्त केला असून कपूर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

( नक्की वाचा : 'कुछ कुछ होता है'मधील अंजलीचा फोटो व्हायरल, 27 वर्षानंतरचा लुक पाहून बसणार नाही विश्वास )

दरम्यान,  संजय कपूर हे सोना कॉमस्टारचे अध्यक्ष होते. संजय कपूर यांचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिले आहे. 2003 मध्ये त्यांनी करिश्मा कपूरशी लग्न केले होते पण 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या जोडप्याला दोन मुले आहेत - समीरा आणि कियान. घटस्फोटानंतर संजय यांनी मॉडेल आणि उद्योजिका प्रिया सचदेवशी लग्न केले.

Advertisement

Sanjay Kapoor Death: अभिनेत्री करिश्मा कपूरच्या Ex-पतीचे निधन; पोलो खेळता खेळता गमावला जीव