
Sanjay Kapoor Death: सिनेविश्वातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे पूर्वीश्रमीचे पती आणि उद्योगपती संजय कपूर यांचे निधन झाले आहे. इंग्लंडमधील गार्ड्स पोलो क्लबमध्ये ही दुःखद घटना घडली. पोलो खेळता खेळताच ते कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संजय कपूर हे अभिनेत्री करिश्मा कपूर यांचे माजी पती होते. करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे 2003 मध्ये लग्न झाले. या त्यांनामुलगी समायरा आणि मुलगा कियान अशी दोन मुले झाली. मात्र लग्नाच्या काही वर्षांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा निर्माण झाला त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. 2014 मध्ये करिश्माने घटस्फोटासाठी अर्ज केला. 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या वेळी करिश्माने संजयवर अनेक गंभीर आरोप केले होते, ज्यात मानसिक आणि भावनिक छळाचा समावेश होता. हे प्रकरण सिनेविश्वात चांगलेच गाजले होते.
धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूच्या तासांपूर्वीच संजय कपूर यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करणारी पोस्ट एक्स माध्यमावर शेअर केली होती. अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या अपघाताची बातमी दुर्दैवी आहे. माझ्या भावना आणि प्रार्थना सर्व पीडित कुटुंबांसोबत आहेत. या कठीण काळात त्या सर्वांना शक्ती मिळो,, असं त्यांनी म्हटलं होते. या ट्वीटनंतर काही वेळानंतर त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, संजय कपूर यांच्या अचानक निधनाने सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात आहे.
( नक्की वाचा : 'कुछ कुछ होता है'मधील अंजलीचा फोटो व्हायरल, 27 वर्षानंतरचा लुक पाहून बसणार नाही विश्वास )
दरम्यान, करिश्मासोबत काडीमोड झाल्यानंतर संजय कपूरने प्रिया सचदेवशी लग्न केले. संजयच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर सोशल मीडियावर लोक शोक व्यक्त करत आहेत. करिश्मा कपूरकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. करिश्मा आणि संजय कपूर वेगळे झाले होते, परंतु संजय त्याच्या मुलांना अनेकदा भेटत असे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world