
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने (Karisma Kapoor) आज (गुरुवार 19 जून) तिचे माजी पती संजय कपूर (Sunjay Kapur) यांना अखेरचा निरोप दिला. दिल्लीतील स्मशानभूमीत झालेल्या अंत्यसंस्कारात करिश्मा पारंपरिक पांढऱ्या सलवार-सूटमध्ये उपस्थित होती. त्यावेळी तिच्याबरोबर मुलगी समायरा आणि मुलगा कियान हे देखील उपस्थित होते. करिश्माची बहीण करीना कपूर आणि तिचा पती सैफ अली खान हे सुद्धा दिल्लीत पोहोचले होते, मात्र व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ते दिसले नाहीत. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये करिश्मा कपूर शांतपणे उभी राहून तिच्या माजी पतीला श्रद्धांजली वाहताना दिसली. त्यावेळी ती चांगलीच भावुक झाली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संजय कपूर यांचे निधन
संजय कपूर यांचे काही दिवसांपूर्वी इंग्लंडमधील विंडसर येथे पोलो मॅचदरम्यान निधन झाले. रिपोर्ट्सनुसार, मॅच खेळताना संजय यांनी चुकून एक मधमाशी गिळली, ज्यामुळे त्यांना तीव्र ॲलर्जी झाली आणि तिथेच त्यांना हार्ट अटॅकचा झटका आला. डॉक्टरांनी पूर्ण प्रयत्न करूनही त्यांचा जीव वाचू शकला नाही.
( नक्की वाचा : Sunjay Kapur : 10 दिवस लग्न, 126 देशातील पाहुणे, 100 कोटी खर्च! कोण होता संजय कपूरच्या पत्नीचा पहिला नवरा? )
आणखी एक दुःखाची गोष्ट म्हणजे, आपल्या मृत्यूच्या काही तास आधीच संजय कपूर यांनी सोशल मीडियावर एअर इंडिया विमान अपघातावर शोक व्यक्त केला होता. त्यांच्या शेवटच्या पोस्ट्समध्ये जीवनाशी संबंधित प्रेरणादायी संदेश होते. एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते, 'तुमचा वेळ मर्यादित आहे, त्यामुळे 'काय झाले असते तर' (what if) सोडून द्या आणि 'का नाही' (why not) यावर लक्ष केंद्रित करा."
करिश्मा आणि संजय यांचे नाते
संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचे लग्न 2003 मध्ये झाले होते. परंतु हे नाते फार काळ टिकले नाही. 2014 मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. करिश्माला दोन्ही मुलांची कस्टडी मिळाली, तर संजय यांना त्यांना भेटण्याचा अधिकार मिळाला होता. संजय कपूर एक दिग्गज व्यावसायिक होते. इलेक्ट्रिक वाहनांसाठी ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या Sona Comstar चे अध्यक्ष होते. त्यांना पोलो खेळाचीही खूप आवड होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world