Karisma Kapoor Children: एके काळी बॉलिवूडमध्ये दबदबा असलेली अभिनेत्री म्हणून करिश्मा कपूरकडे पाहीले जाते. सध्या करिश्मा इंडियाज बेस्ट डान्स सिजन 4 मध्ये जजच्या भूमिकेत आहे. या शो दरम्यान तिनं एक मोठा खुलासा केला आहे. तिने हे वक्तव्य पहिल्यांदाच केले आहे. त्यात तिने आपल्याला एकूण किती मुलं आहेत हे सांगितलं आहे. आता पर्यंत तिच्या फॅन्सला तिला दोन मुलं असल्याचं माहित होतं. पण या शो मधून करिश्माने आपल्या चाहत्यांना आपल्याला किती मुलं आहेत हेच सांगून टाकलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
करिश्मा कपूर यांनी पहिल्यांदाच सांगितले की तिला एकूण दोन नाही तर पाच मुलं आहे. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पण ही माहिती स्वत: करिश्मा कपूर हिनं दिली आहे. करिश्मा सांगते की मला स्वत:ची दोन मुलं आहे. तर करिना कपूरही माझी मुलगीच आहे. ती माझी पहिली मुलगी आहे. शिवाय करिनाला असलेले तैमूर आणि जेह हे पण माझ्य मुलांसारखेच आहेत. त्यामुळे मला ऐकूण पाच मुलं आहेत असा खुलासाच करिश्मा कपूर हीनं केला आहे. करिनासह तिच्या दोन्ही मुलांना करिश्मा आपली मुलं मानते.
या शोमध्येच अनेक गोष्टी करिश्मा कपूरने मांडल्या आहे. चित्रपट क्षेत्रात खूप मेहनत घेतली. मी कधी चांगली डान्सर होवू शकते हे कधी वाटलं नव्हतं असही ते सांगते. नेहमी काही तरी चांगलं करावं हाच विचार डोक्यात असायचा असंही तीने सांगितले. नेहमी डोक्यात विचार असायचा, आता नविन काय करायचे? ते अधिक चांगले कसे होईल याचाच विचार डोक्यात फिरत होता. जी मेहनत करते ती मजदूरीच असल्याचेही यावेळी करिश्माने सांगितले.
ट्रेंडिंग बातमी - साता सुमद्रापार ऑस्ट्रेलियात कसा होतोय गणेशोत्सव? ही बातमी नक्की वाचा
करिश्मा कपूर ही सुपरस्टार रणधीर कपूर आणि बबीता यांची मुलगी आहे. करिश्मा कपूरने उद्योगपती संजय कपूर यांच्या बरोबर लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलं आहेत. त्यात मुलगी समायरा आणि मुलगा कियान आहे. लग्नानंतर 2016 मध्ये करिश्मा कपूरने पती संजय कपूर बरोबर घटस्फोट घेतला. दोघांनी ही वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. दोघांचे विवाहीत जिवन तेवढं चांगलं नव्हतं. याबाबत करिश्मा कपूरने वेळोवेळी सांगितले होते. शेवटी हे संबध ताणले गेले आणि दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
करिश्मा कपूरने वयाच्या 16 व्या वर्षी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. 1991 मध्ये तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रेम कैदी हा तिचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर राजाबाबू, अनाडी, अंदाज अपना अपना, गोपी किशन, राजा हिंदुस्तानी, दिल तो पागल है या सारखे एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले होते. करिश्मा कपूर यशाच्या शिखरावर होती. बॉलिवूडमध्ये तिचा दबदबा होता. मिस्ट्री थ्रिलर फिल्म मर्डर मुबारकमध्ये ती शेवटची दिसली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्वर प्रदर्शित झाला होता.