जाहिरात

Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजेबाबत सविस्तर माहिती

Ganesh Chaturthi Date: पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. शुभ मुहूर्तासह उत्सवाची संपूर्ण माहिती जाणून घ्या...

Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजेबाबत सविस्तर माहिती

Ganesh Chaturthi 2024: लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी भाविक जय्यत तयारीमध्ये व्यस्त आहेत. देशभरात हा सण उत्साहात साजरा केला जातो. गणपती बाप्पाची पूजा केल्यास जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि सुखाचा वर्षाव होतो, असे म्हणतात. कारण बाप्पा दुःखहर्ता आहे. गणेशोत्सवास कधीपासून सुरुवात होत आहे? गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घेऊया सविस्तर माहिती... 

Ganesh Chaturthi 2024: कधी आहे गणेश चतुर्थी? गणेशोत्सवादरम्यान जुळून आले मोठे योग, जाणून घ्या माहिती

(नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2024: कधी आहे गणेश चतुर्थी? गणेशोत्सवादरम्यान जुळून आले मोठे योग, जाणून घ्या माहिती)

गणेश चतुर्थीची तिथी | Ganesh Chaturthi Date 

पंचांगानुसार, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यंदा चतुर्थी तिथी 6 सप्टेंबर म्हणजे शुक्रवारी दुपारी 12:08 वाजता सुरू होईल ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 सप्टेंबरला तिथी समाप्त होईल. उदया तिथीनुसार 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थीचे व्रत (Ganesh Chaturthi Vrat) करणे शुभ ठरेल.

7 सप्टेंबर रोजी सकाळी 11:03 वाजेपासून ते दुपारी 1:34 वाजेपर्यंत गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त आहे. या मुहूर्तादरम्यान पूजा करणे फलदायी ठरेल. 

Ganesh Chaturthi 2024: गणपती बाप्पासाठी तयार करा रोझ फ्लेव्हर मोदक

(नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2024: गणपती बाप्पासाठी तयार करा रोझ फ्लेव्हर मोदक)

गणेश चतुर्थीची पूजा 

मान्यतेनुसार गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणतात. हिंदू धर्मानुसार कोणत्याही महत्त्वपूर्ण कार्याचा शुभारंभ करताना सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करणे शुभ मानले जाते. कारण बाप्पाला अग्रपूजेचा मान मिळाला आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि बाप्पाची विधीवत पूजा केली जाते. 

गणेश चतुर्थीच्या पूजनामध्ये मातीची गणेश मूर्ती, चौरंग, केळीचे खांब, लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र, नवीन वस्त्र, धूप-अगरबत्ती, कापूर, मोदक, केळी, हळद-कुंकू, कलश, फळ, फुले, अक्षता, आंब्याच्या डहाळ्या, पंचामृत, सुपारी इत्यादी गोष्टींचा पूजेच्या सामग्रीमध्ये समावेश केला जातो. 

Ganesh Chaturthi 2024: गणपती बाप्पाची स्थापना का करतात? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण  

(नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2024: गणपती बाप्पाची स्थापना का करतात? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण)

गणेश चतुर्थीला भाविक वाजतगाजत बाप्पाचे जल्लोषात स्वागत करतात. बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते. आरती-गणेश चालीसाचे पठण केले जाते. गणेश व्रताची कथा वाचली जाते आणि पूजा करून बाप्पाला नैवेद्य अर्पण केला जातो.  

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Beed | अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव, मूर्ती साकारण्यासाठी मूर्तीकारांची लगबग

Switch To Dark/Light Mode
Previous Article
Gauri Pujan : लाडक्या गौराईंना 16 प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य का दिला जातो? 16 आकड्यामागील कारण काय?
Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजेबाबत सविस्तर माहिती
Ganesh Chaturthi 2024 date shubh muhurat puja and auspicious yoga details
Next Article
Ganesh Chaturthi 2024: कधी आहे गणेश चतुर्थी? गणेशोत्सवादरम्यान जुळून आले मोठे योग, जाणून घ्या माहिती