जाहिरात

Kartik Aryan : कार्तिक आर्यन या साऊथ अभिनेत्रीला करतोय डेट? आईच्या वक्तव्याने चर्चांवर शिक्कामोर्तब?

कार्तिक आर्यनच्या घरी नुकत्याच झालेल्या कौटुंबिक कार्यक्रमातही श्रीलीला दिसली होती. यानंतर, या अफवांना आणखी बळकटी मिळाली.

Kartik Aryan : कार्तिक आर्यन या साऊथ अभिनेत्रीला करतोय डेट? आईच्या वक्तव्याने चर्चांवर शिक्कामोर्तब?
कार्तिक आर्यन

बॉलिवूडचा चॉकलेट कार्तिक आर्यनचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. सारा अली खानपासून ते अनन्या पांडेपर्यंत अनेक अभिनेत्रीसोबत अफेअरच्या चर्चा रंगल्या. मात्र आता कार्तिकची त्याच्या आगामी चित्रपटातील अभिनेत्रीशी वाढती जवळीक याबद्दल चर्चा आहे. साऊथची अभिनेत्री श्रीलीलासोबतच्या त्याच्या अफेअरच्या चर्चा आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कार्तिक आर्यनच्या घरी नुकत्याच झालेल्या कौटुंबिक कार्यक्रमातही श्रीलीला दिसली होती. यानंतर, या अफवांना आणखी बळकटी मिळाली. आता कार्तिक आर्यनच्या आईने उघडपणे असे काही सांगितले आहे ज्यानंतर चाहत्यांनी या चर्चा खऱ्या असल्याचं मानण्यास सुरुवात केली आहे. आयफा अवॉर्ड्स 2025 मध्ये करण जोहरच्या प्रश्नाला उत्तर देताना, कार्तिक आर्यनच्या आईने सून कशी हवी याची माहिती दिली. 

Latest and Breaking News on NDTV

(नक्की वाचा- Dhanashree Varma Post : युजवेंद्र चहल-RJ महवशचे फोटो व्हायरल, धनश्री वर्माची पोस्ट चर्चेत, म्हणाली...)

कार्तिकची आई काय म्हणाली? 

कार्तिक आर्यनच्या आईने तिला कशी सून हवी आहे? याबाबत म्हटलं, "घरी मागणी असते की एक चांगली डॉक्टर असावी." हे ऐकून करण जोहरही  चकीत झाला. आता चाहते असा दावा करत आहेत की कार्तिक आर्यनची आईच्या उत्तराचा अभिनेत्री श्रीलीलाशी संबंध आहे. आता चाहते डॉक्टर सुनेचा अर्थ श्रीलीलाशी जोडत आहेत. 

नक्की वाचा - Chal halla Bol: सेन्सॉर बोर्डाचा उर्मटपणा! नामदेव ढसाळांच्या कुटुंबियांचा अपमान; तुम्ही दलित...

श्रीलीला ही केवळ एक प्रसिद्ध दक्षिण अभिनेत्री नाही तर तिला डॉक्टरही व्हायचे होते. रिपोर्ट्सनुसार, 2021 पर्यंत ती MBBS च्या शेवटच्या वर्षात होती. कार्तिक आर्यनच्या आईने कार्तिक आणि श्रीलीलाच्या नात्याची पुष्टी केली का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )