KBC 16 : 22वर्षांचा तरुण बनला या सिझनचा पहिला करोडपती, तुम्हाला येईल का हे उत्तर?

Kaun Banega Crorepati 16 First Crorepati Contestant: सुपस्टार अमिताभ बच्चन होस्ट असलेल्या 'कौन बनेगा करोडपती' च्या या सिझनला पहिला करोडपती मिळाला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
K
मुंबई:

Kaun Banega Crorepati 16 First Crorepati Contestant: सुपस्टार अमिताभ बच्चन होस्ट असलेल्या 'कौन बनेगा करोडपती' च्या या सिझनला पहिला करोडपती मिळाला आहे. जम्मू काश्मीरमधील चंदर प्रकाश हा 22 वर्षांचा तरुण या सिझनमधील पहिला करोडपती आहे. या भागाचा प्रोमो SonyLiv नं प्रोमो प्रदर्शित केला आहे. त्यामध्ये चंदरला अमिताभ बच्चन मिठी मारताना दिसत आहेत. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

चंदरनं एक कोटींच्या प्रश्नाला शांतपणे आणि आत्मविश्वासानं उत्तर दिलं. चंदरला अमिताभ बच्चन यांनी भूगोला या विषयाशी संबंधित प्रश्न 1 कोटींसाठी विचारला होता. तो प्रश्न होता, 'कोणत्या देशाचं सर्वात मोठं शहर त्याची राजधानी नाही पण, एक बंदर आहे. त्याचा अरबी अर्थ शांती निवास होतो. या प्रश्नाच्या उत्तरासाठी पर्याय होते ए) सोमालिया, बी) ओमान, सी)टांझानिया, डी) ब्रुनेई

चंदरनं बराच विचार करुन या प्रश्नासाठी 'डबल डिप' या लाईफलाईनचा वापर केला. त्यानंतर त्यानं सी)टांझानिया हे उत्तर अमिताभ बच्चन यांना लॉक करण्यास सांगितलं. ते उत्तर बरोबर होतं. त्यामुळे चंदर 16 व्या सिझनमधील पहिला करोडपती बनला. 

1 कोटीसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिल्यानंतर चंदरला अमिताभ बच्चन यांनी 7 कोटीसाठी प्रश्न विचारला. 'उत्तर अमेरिकामध्ये 1857 साली इंग्रज आई-वडिलांपासून जन्मलेला पहिलं नोंदणीकृत मूल कोणतं होतं? चंदरला या प्रश्नाचं उत्तर माहिती नव्हतं. तसंच त्याच्या सर्व लाईफ लाईन संपल्या होत्या. त्यामुळे त्यानं खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. 

( नक्की वाचा :  उर्मिला मातोंडकरच्या घटस्फोटाची चर्चा! कोण आहे तिचा नवरा मोहसीन अख्तर मीर? )

चंदर सध्या यूपीएससीची तयारी करत आहे. त्यानं आत्तापर्यंत आयुष्यात बराच संघर्ष केला आहे.चंदरचा जन्म झाला त्यावेळी त्याच्या आतड्यामध्ये ब्लॉकेज होते. त्यामध्ये त्याची आत्तापर्यंत सात वेळा सर्जरी झाली आहे. पण, अजूनही आतड्याच्या काही अडचणी कायम आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला आठव्या सर्जरीचा सल्ला दिला आहे. अमिताभ बच्चन यांनी देखील चंदरच्या आजवरच्या प्रवासाची प्रशंसा केली. 


 

Topics mentioned in this article