अभिनेत्री उर्मिला मातोंडकरबाबत एक मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. उर्मिलानं तिचा नवरा मोहसीन अख्तर मीरपासून वेगळं होण्यासाठी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. उर्मिलाच्या लग्नाच्या माहिती इतकीच ही माहिती देखील तिच्या फॅन्ससाठी धक्कादायक आहे. 'हिंदुस्थान टाईम्स'ला तिच्या जवळच्या व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार,'उर्मिलानं मोहसीनबरोबचा विवाह संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तिनं यापूर्वीच कोर्टात याचिका दाखल केली आहे. या घटस्फोटाचं कारण अद्याप समजलेलं नाही.पण, हा घटस्फोट परस्पर संमतीनं होणार नाही.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कधी आणि कुठं झालं होतं लग्न?
उर्मिला मातोंडकर आणि मोहसीन अख्तर मीर यांचं लग्न 4 फेब्रुवारी 2016 रोजी झालं होतं.दोघांचं लग्न उर्मिलाच्या मुंबईतील घरात काही जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये झाले होते. या दोघांची पहिली भेट डिझायनर मनिष मल्होत्राच्या जवळच्या व्यक्तीच्या लग्नामध्ये 2014 साली झाली होती. दोघांच्या वयात 10 वर्षांचं अंतर आहे.
( नक्की वाचा : 99 लाख वेटिंग, 10 लाख तिकीट! काय आहे Coldplay ज्यासाठी भारतीय फॅन्स करतायत पाण्यासारखा पैसा खर्च )
कोण आहे मोहसीन?
मोहसीन अख्तर काश्मीरी आहे. तो मॉडल आणि व्यावसायिक आहे. वयाच्या 21 व्या वर्षीच तो मॉडलिंग आणि अभिनयाच्या क्षेत्रात करियर करण्यासाठी मुंबईमध्ये आला होता. तो 2007 मधील मिस्टर इंडिया पेजेंटचा दुसरा रनरअप होता. त्यानंतर त्यानं प्रीती झिंटासोबत एका जाहिरातीमध्येही काम केलं आहे. त्याचबरोबर 'इट्स अ मॅन वर्ल्ड', 'लक बाय चान्स', 'मुंबई मस्त कलंदर' आणि 'बीए पास' या चित्रपटांमध्येही त्यानं भूमिका केली आहे.
उर्मिलानं शेखर कपूरच्या मासूममधून बाल कलाकार म्हणून पदार्पण केलं होतं. रंगिला, कौन, सत्या, खूबसूरत, जुदाई ,प्यार तूने क्या किया आणि एक हसीना थी या चित्रपटातील सशक्त भूमिकांच्या माध्यमातून तिनं लाखो फॅन्सच्या ऱ्हदयात जागा निर्माण केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world