Amitabh Bachchan Emotional : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना त्यांच्या 'कौन बनेगा करोडपती' (KBC) च्या 17 व्या पर्वामध्ये एका स्पर्धकाकडून व्हीगनिझम (Veganism) या जीवनशैलीचे नैतिक सत्य समजून घेतल्यावर मोठा धक्का बसला. याबद्दल विचार केल्यानंतर त्यांना 'त्रासल्यासारखं' वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्राण्यांचे शोषण आणि छळ थांबवण्यासाठी मांस, दूध, अंडी यांसारख्या प्राण्यांपासून मिळणाऱ्या सर्व उत्पादनांना टाळणे म्हणजे व्हीगनिझम होय.
स्पर्धकानं काय सांगितलं?
केबीसी 17 मध्ये सहभागी झालेले स्पर्धेक सिद्धार्थ शर्मा यांनी अमिताभ बच्चन यांना सांगितलं की ते गेली 7 वर्षं व्हीगन जीवनशैलीचे पालन करत आहेत आणि प्राण्यांपासून मिळणारे कोणतेही उत्पादन वापरत नाहीत. ही जीवनशैली नेमकी काय आहे, हे समजून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या बच्चन यांनी त्यांना प्रश्न विचारला, "म्हणजे तुम्ही प्राण्यांपासून आलेली कोणतीही गोष्ट वापरत नाही?"
( नक्की वाचा : KBC मध्ये 1 कोटी जिंकल्यावर खात्यात किती पैसे येतात? फार कमी लोकांना माहीत आहे उत्तर )
यावर शर्मा यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. ते म्हणाले, "जसं आपल्याला जगण्याची इच्छा आहे, तशीच त्यांनाही आहे. त्यामुळे मी प्राण्यांपासून मिळालेली कोणतीही गोष्ट घेत नाही. दूध हे फक्त वासरांसाठी बनवलेलं असतं. तसेच, कोणत्याही प्राण्याला आयुष्यभर नैसर्गिकरित्या गरोदर राहता येत नाही, त्यांना कृत्रिमरित्या गर्भधारणा घडवून आणली जाते. हे मला अनैतिक वाटतं."
बच्चन यांची प्रतिक्रिया स्पर्धकाचे हे विचार ऐकून अमिताभ बच्चन खूपच गंभीर झाले. ते म्हणाले, "आज घरी जाऊन मला याचा खूप त्रास होणार आहे." पुढे त्यांनी सिद्धार्थ शर्मा यांचे आभार मानत कबूल केले, "तुम्ही आज माझे डोळे उघडले आहेत (You have opened my eyes)."
शाकाहारी आहेत अमिताभ बच्चन
बच्चन यांचा आहार अमिताभ बच्चन यांनी अनेक वर्षांपूर्वीच मांसाहार सोडून शाकाहार स्वीकारला आहे. 2000 पासून त्यांनी शाकाहारी जीवनशैलीचा अवलंब केला. 'केबीसी'च्या १५ व्या सिझनमध्ये त्यांनी पूर्वी मांसाहार आवडत असल्याचे सांगितले होते, पण आरोग्याच्या कारणांमुळे तो सोडल्याचे स्पष्ट केले. ते सध्या मिठाई, भात, मांसाहार, चहा, कॉफी, अल्कोहोल आणि शीतपेये पूर्णपणे टाळतात. त्यांच्या आहारात नाश्त्याला दूध आणि अंडा भुर्जी, तर दुपारच्या जेवणात पोळी, डाळ आणि हिरवी भाजी असते. रात्रीचे जेवण ते अतिशय हलके ठेवतात.