'खोसला का घोसला' मधील मुख्य अभिनेता कार अपघातामध्ये गंभीर जखमी, ICU मध्ये दाखल

Khosla Ka Ghosla Actor Parvin Dabas In ICU :   'खोसला का घोसला' मधील 'चिरौंजीलाल' या भूमिकेनं चित्रपट रसिकांच्या मनात खास स्थान निर्माण केलेला अभिनेता परनीन डबास अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
Khosla Ka Ghosla मधील अभिनेता परवीन डबासला ICU मध्ये दाखल करण्यात आलं आहे.
मुंबई:

Khosla Ka Ghosla Actor Parvin Dabas In ICU :   'खोसला का घोसला' मधील 'चिरौंजीलाल' या भूमिकेनं चित्रपट रसिकांच्या मनात खास स्थान निर्माण केलेला अभिनेता परनीन डबास अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे. त्याला मुंबईतील होली फॅमिली हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

परवीन शनिवारी सकाळी रस्ते अपघातामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे. 50 वर्षांच्या परवीननं 'मान्सून वेडिंग' 'मैंने गांधी को नहीं मारा', 'खोसला का घोसला', 'द परफेक्ट हसबंड" आणि 'द वर्ल्ड अनसीन' या प्रमुख हिंदी आणि इंग्रजी सिनेमात भूमिका केली आहे.   

परवीन डबासची पत्नी प्रीती झांगियानीनं याबाबत एक वक्तव्य प्रसिद्ध करत अपघाताची माहिती दिली आहे. 'हे सांगायला आम्हाला खेद होतोय की बॉलिवूड अभिनेता आणि प्रो पंजा लीगचे सह-संस्थापक परवीन डबासला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे,' असं प्रीतीनं सांगितलं. 

( नक्की वाचा : 90 किमी सायकलिंग, 21 किमी रनिंग, 1.9 किमी पोहणे! बॉलिवूड अभिनेत्रीनं केलं सर्वांनाच थक्क )

दिल्लीमध्ये जन्म झालेल्या परवीनची नुकताच प्रदर्शित 'मेड इन हेवन' सिझन 2 आणि ताहिरा कश्यपच्या 'शर्माजी की बेटी' यामध्येही भूमिका होती.