Saiyami Kher : 'घूमर' या हिंदी चित्रपटात हात गमावलेल्या क्रिकेटपटूची भूमिका करुन सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या सैयामी खेरनं अनेकांना जमणार नाही अशी कामगिरी केली आहे. सैयामीनं जर्मनीतील आयर्नमॅन 70.3 ट्रायथलॉन ही खडतर स्पर्धा पूर्ण केली आहे. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी 90 किलोमीटर सायकलिंग, 21.1 किलोमीटर रनिंग आणि 1.9 किलोमीटर पोहणे हे टप्पे पूर्ण करावे लागतात. आयर्नमॅनची खडतर शर्यत पूर्ण करणारी सैयामी पहिली भारतीय अभिनेत्री आहे. सैयामीानं स्वत: इन्स्टाग्रामवर या कामगिरीचा फोटो शेअर केला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आयर्नमॅन ही जगातील खडतर स्पर्धा मानली जाते. त्यामध्ये स्पर्धकाच्या शारीरिक तसंच मानसिक क्षमतेचा मोठा कस लागतो. ही स्पर्धा पूर्ण करण्याची सैयामीची खूप दिवसांपासून इच्छा होती. अखेर हे लक्ष्य पूर्ण केल्याबद्दल सैयामीनं आनंद व्यक्त केला आहे.
'ही शर्यत पूर्ण करणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मी खूप दिवसांपासून याचं नियोजन करत होते. हा माझ्या आयुष्यातील आत्तापर्यंतचा सर्वात अभिमानाचा क्षण आहे. या शर्यतीमध्ये पळण्यापेक्षा याची तयारी करणे अधिक कठीण होतं. यासाठी मला रोज 12-14 तास सराव करावा लागला. या शर्यतीमध्ये माझी लढाई माझ्याशीच होती,' अशी भावना सैयामीनं व्यक्त केली आहे.
सैयामीनं 2016 साली 'मिर्झा लेडी' मधून कारकिर्दीला सुरुवात केली. घुमर या सिनेमातील तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. या सिनेमात अभिषेक बच्चनची प्रमुख भूमिका होती. तसंच अमिताभ बच्चननं ही पाहुणा कलाकार म्हणून काम केलं होतं.
( नक्की वाचा : चेन्नई टेस्टमध्ये विराटनं केली भर मैदानात चूक, फॅन्स ते रोहित शर्मा सर्वांनाच धक्का )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world