KP Chowdary : 650 कोटी कमाई करणाऱ्या रजनीकांतच्या चित्रपटाच्या निर्मात्याचा मृत्यू, गोव्यात आढळला मृतदेह

निर्मात्याने पंख्याला गळफास घेत स्वताचा जीव संपवल्याची माहिती आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

टॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध निर्मात्याचा मृतदेह गोव्यात सापडला. त्याने पंख्याला गळफास घेत स्वताचा जीव संपवल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपट सृष्टीत झालेल्या आर्थिक नुकसानीनंतर ड्रग्स प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात त्याला दिलासाही मिळाला होता. हा निर्माता गोव्यात एक पब चालवित होता. त्यातच तो आजारी असल्याची माहिती आहे. 

2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या कबाली चित्रपटाचे निर्माता सुंकारा कृष्ण प्रसाद चौधरी यांनीच केली होती. दरम्यान सुंकारा यांनी टोकाचं पाऊल का उचललं यामागील कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरू आहे. सुंकारा केवळ टॉलिवूडचं (Telugu film industry) नाही तर कॉलिवूडमध्येही (Tamil film industry) सक्रिय होते. केपी चौधरी यांनी 2016 मध्ये चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. ते तेलगु चित्रपट कबालीचे निर्माता होते. याच रजनीकांत प्रमुख भूमिकेत होता. हा चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटाने तब्बल 650 कोटी कमाई केली होती. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Bollywood video: 1900 कोटींचा मालक, 60 कोटींचा बंगला, तरीही रस्त्यावर आदिमानव बनून फिरणारा 'तो' कोण?

चौधरींची ड्रग्स प्रकरणात झाली होती अटक
2023 मध्ये सायबराबाद पोलिसांनी 93 ग्रॅम कोकेनसह केपी चौधरी याला अटक केली होती. धक्कादायक बाब म्हणजे चौधरीचे ग्राहक कथितपणे चित्रपट क्षेत्राशी संबंधित होते. ज्यात तेलगू, तमिळ चित्रपटातील अभिनेता, अभिनेत्री आणि उद्योग जगतातील लोकांचाही समावेश होता. केपी चौधरी यांनी तेलगुमधील अनेक हिट चित्रपटांचं डिस्ट्रीब्युशन केलं होतं. ज्यात 'गब्बर सिंह', 'सीतम्मा वकितलो सिरिमले चेट्टू' आणि 'अर्जुन सुरवरम' यांचा समावेश आहे. 

Advertisement