- संचिता उगले नालासोपारा येथील आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली
- 'कुमकुम भाग्य' आणि 'वागले की दुनिया' यासारख्या मालिकांमध्ये साकारल्या प्रमुख भूमिका
- घरात कोणीही नसताना संचिता उगलने आत्महत्या केली
- मनोज सातवी, प्रतिनिधी
Kumkum Bhagya Actor Sanchita Ugale Suicide: टीव्ही मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनेक प्रसिद्ध हिंदी टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री संचिता मच्छिंद्र उगले हिने नालासोपारा येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी (14 जून) संध्याकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली. तिने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
संचिता उगलेने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये केले होते काम| Kumkum Bhagya Actor Sanchita Ugale News
अभिनेत्री संचिता उगले हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी टीव्ही जगतात स्वतःची ओळख निर्माण केली होती. तिने 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या मालिकेत नायिका 'सुकून'ची भूमिका साकारली होती. याशिवाय बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या 'छावा' सिनेमामध्ये 'ताराबाई' ही महत्त्वपूर्ण भूमिका तिने निभावली होती. 'कुमकुम भाग्य' आणि 'वागले की दुनिया' यासारख्या लोकप्रिय मालिकांमध्येही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.
(नक्की वाचा : Nagpur News: बलात्कार, ब्लॅकमेलिंग, काळ्या जादूनंतर बळजबरीने धर्मांतर; नागपुरात जवानाच्या पत्नीसोबत भयंकर प्रकार)
घरी कोणी नसताना उचलले टोकाचे पाऊल
संचिता नालासोपारा पूर्वेकडील आचोळे गाव येथे आई-वडील आणि 15 वर्षांच्या लहान बहिणीसोबत राहत होती. रविवारी संध्याकाळी 5.30 वाजता तिची बहीण अंजली काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती. त्यावेळी घरात इतर कोणीही नव्हते. घरात कोणी नसताना संचिताने बेडरूममधील सिलिंग फॅनला साडीने गळफास लावून आपले जीवन संपवले.
संचिताने आत्महत्या केल्याची माहिती समजल्यानंतर तिला तत्काळ वसई-विरार महानगरपालिकेच्या तुळींज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आचोले पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टेमसाठी पाठवून दिला. संचिताने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण समजू शकलेले नाही.