जाहिरात

किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' ऑस्करच्या शर्यतीत, रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'सह 29 चित्रपटांना टाकलं मागे

1 मार्च रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. सुरुवातीला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कामगिरी करू शकला नाही.

किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' ऑस्करच्या शर्यतीत, रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'सह 29 चित्रपटांना टाकलं मागे
मुंबई:

किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' (Laapataa Ladies) चित्रपटाची यंदाच्या वर्षी प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कारांमध्ये (Oscar Award) भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडण्यात आलं आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने या चित्रपटाला भारताकडून अधिकृतरित्य ऑस्करमध्ये पाठवलं आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाकडून याची पुष्टी करण्यात आली आहे. (Film Federation of India)

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काही दिवसांपूर्वी किरण राव यांनी त्यांचा चित्रपट 'लापता लेडीज'ची निवड ऑस्करसाठी केली जावी अशी इच्छा व्यक्त केली होती. विशेष म्हणजे 'लापता लेडीज'ने रणबीर कपूरचा एनिमल, मल्यालम चित्रपट आट्टम आणि पायल कपाडिया यांच्या ऑल वी इमॅजिन एड लाइट सह 29 चित्रपटांना मागे टाकलं आहे. 

1 मार्च रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. सुरुवातीला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कामगिरी करू शकला नाही. मात्र वर्ड ऑफ माऊथ आणि चांगल्या प्रतिक्रियांमुळे हळूहळू चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोर धरला. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर 'लापता लेडीज' बॉक्स ऑफिसवर एकूण 17.31 कोटींची कमाई करू शकला. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.