जाहिरात
This Article is From Jul 13, 2024

लगानची गौरी तुम्हाला माहित आहे का? 23 वर्षानंतर कशी दिसते? फोटो पाहून तुम्ही ही म्हणाल...

पण त्यावेळी दिसणारी ग्रेसी आणि आता दिसणारी ग्रेसी यांच्यात जमीन आस्मानचा फरक झाला आहे.

लगानची गौरी तुम्हाला माहित आहे का? 23 वर्षानंतर कशी दिसते? फोटो पाहून तुम्ही ही म्हणाल...
ग्रेसी सिंह का बदल गया है पूरा लुक
नवी दिल्ली:

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही अभिनेत्री या आपल्या खास अदांसाठी ओळखल्या जातात. भले त्यांना बॉलिवूडमध्ये यश मिळालेले नसले तरी. त्या पैकीच एक अभिनेत्री म्हणजे ग्रेसी सिंह. हो तिच ग्रेसी सिंह जीने लगान, मुन्नाभाई सारखे चित्रपट केले. ग्रेसी या चित्रपटां पेक्षा सर्वांच्या लक्षात राहीली ती तिच्या स्माईल वरून. ग्रेसीचा अभिनय, त्यात असलेला भावूक पणा, चेहऱ्यावरचे हस्य हे आजही कोणी विसरले नाही. ग्रेसी पहिल्यांदा 2004 साली मोठ्या पडद्यावर आली. अफताब शिवदासानी बरोबर तिने मुस्कान चित्रपटात काम केले. त्यातील गाणी हिट झाली. त्यानंतर तिची एक वेगळीच ओळख निर्माण झाली. पण त्यावेळी दिसणारी ग्रेसी आणि आता दिसणारी ग्रेसी यांच्यात जमीन आस्मानचा फरक झाला आहे. 

ग्रेसी सिंह सोशल मीडियावर सतत एक्टीव्ह असते. ती आपले फोटो व्हीडिओ सोशल मीडियावर शेयर करत असते. ग्रेसीच्या त्यावेळच्या आणि आजच्या लुकमध्ये खुप मोठा फरक आला आहे. पण त्यात एक गोष्ट बदलली नाही. ती म्हणजे तिची स्माईल आणि भावूक पण. सध्या ग्रेसीच्या मुस्कान या चित्रपटातील एक गाणं व्हायरल होत आहे. हे गाण पाहून तिच्या चाहत्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. तिने शेयर केलेल्या व्हीडिओवर भरपूर कमेंट आल्या आहेत. 

तिच्या चाहत्यांनी या व्हीडिओवर कमेट करताना जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत. एकाने लिहीलं आहे की मुस्कान चित्रपट माझा बहीणीचा आवडता चित्रपट आहे. तिला चित्रपट पाहाता यावा म्हणून आम्ही सीडी प्लेअर आणि सीडी भाड्याने घेतल्या होत्या. दुसऱ्याने सांगितलं की सिंपल अभिनेत्री, तिच्यात कोणताही एटिट्यूड नाही असे लिहीले आहे. एकाने लिहीलं आहे अरे मामू जे तो अपनी चिंकी भाभी है.

वर्कफ्रंट नुसार ग्रेसी सिंहनं आपल्या करीअरमध्ये  लाउडस्पीकर, संतोषम, अरमान, देशद्रोही, लगान, अमानत  या चित्रपटात काम केलं. तिने संतोषी माता या सिरीअलमध्येही काम केले. या मालिकेतून तिला एक वेगळी ओळख मिळाली होती. तिला आजही काही जण संतोषी माता म्हणूनच ओळखतात. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: