Latur KBC : केबीसीच्या सेटवर बसणं आणि जिंकणं अनेकांचं स्वप्न असतं. लातूर जिल्ह्यातील एक शेतकरी थेट केबीसीच्या हॉटसीटवर पोहोचला. केवळ हॉटसीटवर पोहोचला नाही तर त्याने २५ लाख जिंकले. लातूर जिल्ह्यातील कोष्टगाव येथील 12वी पास शेतकरी नरहरी डाके याने 'कौन बनेगा करोडपती' या खेळातून 25 लाख रुपये जिंकले आहेत.
नरहरी डाके आधी दुधाचा व्यवसाय करीत होते. मात्र म्हशीचा व्यापार फसल्यानंतर आर्थिक अडचण सुरू झाली होती. दुधाचा व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्याने हरयाणातून म्हशी मागवल्या होत्या. मात्र हरयाणात जाऊन म्हशी पाहू शकत नसल्याने व्यापाराने त्याची फसवणूक केली आणि दूध न देणाऱ्या म्हशी पाठवल्या. खर्च करूनही काहीच उत्पन्न होत नव्हतं. खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी बायकोचे मंगळसूत्र विकावे लागले. त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्याने KBC मध्ये जाऊन पैसे जिंकायचे ठरवले आणि यशस्वी सुद्धा झाला.
तीन किलोमीटर दूरवर दुधाचे कॅन डोक्यावर घेऊन जावे लागते. अडचणी अनेक येतात मात्र त्यावर मात करण्यासाठी मार्गही अनेक असतात असे शेतकरी सांगतो. या शेतकऱ्याने अमिताभ बच्चन याच्या समोर उत्तरं दिली. यात तो २५ लाख रुपये जिंकला.