Like and subscribe Movie: अमेय वाघसोबत गौतमी पाटील थिरकणार आणि संपूर्ण महाराष्ट्रावर लिंबू फिरवणार

Amey Wagh And Gautami Patil Dance: गौतमी पाटील पहिल्यांदाच झळकणार मोठ्या पडद्यावर... पाहिले का हे धमाकेदार गाणे?

जाहिरात
Read Time: 2 mins

Amey Wagh And Gautami Patil Dance: काही दिवसांपूर्वी अभिनेता अमेय वाघसोबत पाठमोऱ्या उभ्या असणाऱ्या तरुणीचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. तेव्हापासूनच ही अभिनेत्री कोण आहे? याची सर्वत्र चर्चा रंगली होती. अखेर या त्या तरुणीचा चेहरा समोर आला आहे. ही तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगणा गौतमी पाटील आहे. नुकतेच तिचे आणि अमेय वाघचे 'लाईक आणि सबस्क्राईब' या सिनेमातील पहिले धमाकेदार गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेल्या 'लिंबू फिरवलंय' या भन्नाट गाणे अमितराजने संगीतबद्ध केले आहे. तर वैशाली सामंत आणि रवींद्र खोमणे यांनी हे गाणे गायले आहे.   

ठेका धरायला लावणारे गाणे

हे गाणे प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे आहे. 'लिंबू फिरवलंय' या गाण्याच्या निमित्ताने गौतमी पाटील पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर जलवा दाखवणार आहे. आपल्या नखरेल अदाकारांनी घायाळ करणारी गौतमी पाटील या गाण्यातून संपूर्ण महाराष्ट्रावर लिंबू फिरवणार आहे, असे म्हणायला हरकत नाही.

दिग्दर्शक अभिषेक मेरुकर यांनी गाण्याबाबत म्हटलंय की, "एक धमाल गाणे असायलाच हवे, असा अट्टाहास असल्याने 'लिंबू फिरवलंय' एक दमदार गाणे 'लाईक आणि सबस्क्राईब' मधून आम्ही घेऊन आलो आहोत. तुफान वाजणारे हे गाणे अतिशय कमाल पद्धतीने चित्रित करण्यात आले आहे. संगीत टीम, नृत्य दिग्दर्शन या सगळ्याच गोष्टी उत्तम जुळून आल्या आहेत. यामध्ये गौतमी पाटीलचा ठसकेबाज परफॉर्मन्सने गाण्यामध्ये अधिकच रंगत आणली आहे. हे गाणे रिलीज झाल्यानंतर प्रत्येक समारंभात नक्कीच वाजेल, याची खात्री वाटते." 

सिनेमामध्ये दिसणार तगडी स्टारकास्ट

'लाईक आणि सबस्क्राईब'मध्ये अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या 18 ऑक्टोबरला हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.