Lok Sabha Election 2024: अक्षय कुमारपासून ते जान्हवी कपूरपर्यंत, या बॉलिवूडकरांनीही केले मतदान

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. बॉलिवूडकरांनीही मतदान करून आपले कर्तव्य बजावले आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

Lok Sabha Election 2024:  लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. मुंबईमध्येही मतदान प्रक्रिया सुरू आहे. बॉलिवूडमधील कलाकारांनीही मतदानाचा हक्क बजावत नागरिकांनाही घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले. अक्षय कुमार, राजकुमार राव, जान्हवी कपूरसह अन्य कलाकारांनीही मतदान केले. बॉलिवूडकरांचे मतदान केल्यानंतरचे व्हिडीओ - फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

"...अन्यथा तक्रार करण्याचा अधिकार नाही"

'समस्या बदलत राहतात, समस्या असतात. लोकांच्या समस्या सोडवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मुद्दा असो किंवा नसो, मतदान करणे तुमचा हक्क आणि जबाबदारीही आहे. तर मग ती निभावणे आवश्यक आहे. अन्यथा तक्रार करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. - दिग्दर्शक मेघना गुलजार 

मतदान केंद्रावर बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा स्टायलिश पारंपरिक लुक पाहायला मिळाला.

दंगल फेम अभिनेत्री सान्या मल्होत्रा

Advertisement

अभिनेता राजकुमार राव सध्या श्रीकांत सिनेमामुळे चर्चेत आहे. त्यानेही मतदान करून आपले कर्तव्य बजावले. "देशाप्रती आपणा सर्वांची ही एक मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी मतदान केले पाहिजे. सर्वांना आवाहन करतो की कृपया घराबाहेर पडा आणि मतदान करा" असे आवाहनही राजकुमारने केले आहे.

Advertisement

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार

"योग्य उमेदवाराला मतदान केले आहे. घरातून मतदान करण्याचा पर्याय निवडला नाही. कारण लोकांना प्रेरणा मिळावी आणि घराबाहेर पडून त्यांनी मतदान करावे", अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी मतदानानंतर दिली. 

Advertisement

मतदान न करणाऱ्यांविरोधात काय म्हणाले परेश रावल?

अभिनेता मनोज वाजपेयीची मतदानानंतरची प्रतिक्रिया 

"हा सर्वात मोठा उत्सव आहे आणि प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. कारण आता तुम्हाला ही संधी पाच वर्षांनंतर मिळणार आहे. तुम्ही मतदान केले नसेल तर तक्रार करण्याचा अधिकार तुम्हाला मिळणार नाही".

ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय

अनिल कपूर

ज्यांनी तुम्हाला साथ दिली, तुमचे काम केले आहे. त्यांना मतदान करा - विशाल ददलानी 

आज लोकशाहीचा उत्सव आहे - ज्येष्ठ अभिनेते अनुपम खैर 

घरातून बाहेर पडा आणि मतदान करा - अभिनेता गोविंदा 

 ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र 

 "मतदान ही आपली जबाबदारी आणि आपला विशेषाधिकार आहे. मतदान हा आपला आवाज आहे" 

 400 पारचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा यशस्वी होईल - ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी 

 अभिनेता रणदीप हुडा

 लोकशाहीचा याहून मोठा उत्सव असू शकत नाही - गायक कैलाश खैर 

नाशिक : व्हिलचेअरवर बसून आजीबाईंनी केलं मतदान, तुम्ही बजावलंत का आपलं कर्तव्य?