शर्मिला टागोर ते अनुष्का शर्मापर्यंत अनेक बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी टीम इंडियाच्या क्रिकेटपटूची आयुष्याचा जोडीदार म्हणून निवड केली. काही अभिनेत्री-क्रिकेटपटूंच्या अफेयरची चर्चाही रंगली. तर काही अभिनेत्रींचे क्रिकेटपटू हे क्रश होते. 1990 च्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणारी माधुरी दीक्षितही त्याला अपवाद नाही.
तेजाबमधील 'एक-दोन-तीन' या गाण्यानं माधुरीनं चित्रपट फॅन्सचं स्वत:कडं लक्ष वेधलं. हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा इतिहास एक-दोन-तीन शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. माधुरीनं 'अबोध या सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पण, तिला खरा ब्रेक 'तेजाब' नं दिला. तेजाब सुपरडुपर हिट झाला. त्यानंतर माधुरीनं मागं वळून पाहिलं नाही. राम लखन, दिल, राजा, बेटा, साजन, खलनायक, हम आपके है कौन, दिल तो पागल है यासारखे सुपरहिट सिनेमे तिनं दिले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माधुरीच्या स्वप्नात कोण?
लाखो तरुणांची धडकन असलेली माधुरी दीक्षित आणि क्रिकेटपटू अजय जडेजा यांच्यातील रिलेशनशिपच्या चर्चा ऐकेकाळी चांगल्याच रंगल्या होत्या. त्याशिवाय माधुरीला एका क्रिकेटपटूवर क्रश होता. त्याच्या मागं पळण्याची माधुरीची इच्छा होती. इतकंच नाही तर तो तिच्या स्वप्नातही येत असे. तो क्रिकेटपटू होता सुनील गावस्कर.
भारतच नाही तर जागतिक क्रिकेटपटूंमधील 'ऑल टाईम ग्रेट' क्रिकेटपटूंमध्ये सुनील गावस्कर यांचा समावेश होता. 10 जुलै 1949 रोजी गावस्कर यांचा जन्म झाला. ते क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम ओपनिंग बॅटर्सपैकी एक आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजार रन्सचा टप्पा पार करणारे ते पहिले क्रिकेटपटू होते.
( नक्की वाचा : कोण आहे स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल? दोघांमध्ये किती आहे वयाचं अंतर, कुणाची कमाई जास्त? )
15 मे 1967 रोजी जन्मलेल्या माधुरी दीक्षितपेक्षा सुनील गावस्कर 18 वर्षांनी मोठा आहे. पण क्रश हा क्रश असतो. माधुरीनं 1992 साली 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होत, मी सुनील गावस्करांची फॅन आहे. ते खूप सेक्सी आहे. मला त्यांच्यामागं पळायचं आहे. ते माझ्या स्वप्नातही येतात. माधुरीनं ही मुलाखत दिली त्यावेळी तिचं वय 25 तर गावस्करांचं वय 43 होतं.