जाहिरात
Story ProgressBack

कोण आहे स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल? दोघांमध्ये किती आहे वयाचं अंतर, कुणाची कमाई जास्त?

Smriti Mandhana boyfriend Palaash Muchhal 5 Years Together: भारतीय महिला क्रिकेट टीमची प्रमुख खेळाडू स्मृती मंधानाचे दोन फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Read Time: 2 mins
कोण आहे स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल? दोघांमध्ये किती आहे वयाचं अंतर, कुणाची कमाई जास्त?
Smriti Mandhana, Palaash Muchhal
मुंबई:

Smriti Mandhana boyfriend Palaash Muchhal 5 Years Together: भारतीय महिला क्रिकेट टीमची प्रमुख खेळाडू स्मृती मंधानाचे दोन फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये ती संगीतकार पलाश मुच्छल सोबत केक कापताना दिसत आहे. हे फोटो पलाशनं इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यानं या फोटोला  #5 असं कॅप्शन दिलंय. एका फोटोत स्मृती आणि पलाश केक कापताना तर दुसऱ्या फोटोत एकत्र पोझ देताना दिसत आहेत. हे फोटो फॅन्समध्ये चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यानंतर पलाश मुच्छल कोण आहे? तो काय करतो? हा प्रश्न अनेकजण विचारतायत. तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर आम्ही त्याचं उत्तर देणार आहोत. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

27 वर्षांची क्रिकेटर स्मृती मंधाना सध्या 29 वर्षांच्या पलाश मुच्छलला डेट करत आहे. पलाश संगीतकार आणि चित्रपट निर्माता आहे. त्यानं बॉलिवूडच्या अनेक गाण्यांना संगीत दिलंय. या दोघांमध्ये दोन वर्षांचं अंतर आहे. पलाशची मोठी बहीण पलक मुच्छल बॉलिवूड गायक आहे. त्यानं सलमान खान ते ऋतिक रोशनपर्यंतच्या चित्रपटांमधील गाण्यांना आवाज दिलाय. पालशची संपत्ती 20 ते 41 कोटींच्या दरम्यान असेल, असा अंदाज आहे.

स्मृती मंधाना WPL च्या इतिहासातील सर्वात महागडी खेळाडू आहे. स्मृतीला 3 कोटी 40 लाख रुपयांमध्ये RCB नं खरेदी केलं होतं. मिडिया रिपोर्टनुसार स्मृतीची एकूण संपत्ती 33 कोटी 29 लाख रुपये आहे. 

( ट्रेंडींग न्यूज : तरुणांमध्ये वाढत असलेला Boysober रिलेशनशिप ट्रेंड काय आहे? यामध्ये मुलं-मुली काय करतात? )
 

पलाश मुच्छलनं शेअर केलेल्या फोटोवर अनेक सेलिब्रेटिंनी रिएक्शन दिली आहे. पलशची बहिण पलक मुच्छललं 'माझे क्यूटीज ( नजर न लावणारी इमोजी) अशी प्रतिक्रिया दिलीय. त्यानंतर तिनं ब्लॅक हॉर्ट इमोजीचा वापर आणखी एका कमेंटमध्ये केलाय. अभिनेता पार्थ सलमाननं लाल हॉर्ट इमोजीची कमेंट केलीय. त्याचबरोबर अभिनेत्री रुबीना दिलेकनंही यावर प्रतिक्रिया दिली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
फडणवीसांनी समजवला राजकारणातील 'डकवर्थ लुईस'चा नियम, मुंबईकरांसाठी केली मोठी मागणी
कोण आहे स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल? दोघांमध्ये किती आहे वयाचं अंतर, कुणाची कमाई जास्त?
how-the-125-cr-prize-money-will-be-distributed-among-the-players-and-support-staff-each-team india player-gets-such-a-huge-amount
Next Article
टीम इंडियाला मिळालेल्या 125 कोटींचं कसं होणार वाटप? प्रत्येकजण होणार मालामाल
;