Mahakali Movie Poster Viral : फिल्म हनुमानच्या माध्यमातून भारतीय सुपरहीरो जॉनरला नवी ओळख देणारे आरकेडी स्टूडियोज आणि दूरदर्शी फिल्ममेकर प्रशांत वर्मा खूप चर्चेत आहेत. प्रशांत वर्मा ज्यांनी त्यांचा पुढचा सिनेमा 'महाकाली'च्या मुख्य अभिनेत्रीबाबत मोठा खुलासा केला आहे. या सिनेमाचा पोस्टर नुकताच प्रदर्शीत करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये भूमी शेट्टी मुख्य भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच्या अभूतपूर्व लूकची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. या सिनेमाचं 50 टक्क्यांपेक्षा जास्त शुटिंग पूर्ण झालं आहे. महाकाली निर्मात्यांनी भूमी शेट्टीच्या रुपात एक नव्या कलाकाराला प्रकाशझोतात आणलं आहे. या अभिनेत्रीला विश्वासात घेतलं असून मोठ्या बजेटवर बोलीही लावली आहे.
या सुपरहिरो पात्रासाठी अनेक टॉप अभिनेत्रींनी इच्छाही व्यक्त केली होती. परंतु, मेकर्सने सिनेमाचं नाव कायम ठेवून एका अशा अभिनेत्रीला निवडलं, जी या सिनेमाच्या स्टोरीला उत्तम अभिनयाची मोहोर लावेल. महाकाली सिनेमाच्या पहिल्या लूकमध्ये भूमीचं रौद्ररुप पाहायला मिळत आहे. भूमी महाकालीच्या थरारक रुपात झळकल्याने सिनेमा पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विशेषत: लाल आणि सोनेरी रंगात रंगलेली, पारंपारिक दागिने आणि पवित्र चिन्हाने सजलेल्या महाकालीचा हा जबरदस्त अवतार पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नक्की वाचा >> Rohit Arya Encounter : कोण होता रोहित आर्या? सर्वांना हादरंवून टाकणारी माहिती आली समोर!
महाकाली सिनेमाचा थरारक पोस्टर आलं समोर
सिनेमाबाबत बोलताना निर्माता प्रशांत वर्मा यांनी म्हटलंय, हुनमान सिनेमानंतर दिव्य स्त्री शक्तीचा सार घेऊन महाकाली सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात इतिहास आणि पुराणातील अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. हा सिनेमा ब्रम्हांडातील शक्तींबाबतही माहिती दर्शवणारा आहे. आम्हाला भूमी शेट्टीच्या निवडीबाबतही मोठा अभिमान आहे. पण जेव्हा आम्ही भूमीच्या या पात्रासाठी निवडलं, तेव्हा तिने या भूमिकेबाबत तयारी दर्शवली. या सिनेमाच्या शुटिंगसाठी तिने कठोर प्रशिक्षण घेतलं.
महाकाली सिनेमातील अभिनेत्रीची होतेय तुफान चर्चा
त्यांच्या डोळ्यात दुर्मीळ तीव्रता आहे. मला विश्वास आहे की, हा सिनेमा प्रेक्षकांसाठी पडद्यावर देवी देवतांना पाहण्याचा दृष्टीकोणच बदलेल. निर्माता प्रशांत वर्मा यांच्यासोबत आर के दुग्गल आणि रिवाज रमेश दुग्गल यांच्या सहयोगाने आरकेडी स्टुडीओज महाकाली सिनेमाला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल. प्रशांत वर्मा यांनी रचनात्मक दृष्टी आणि दिग्दर्शक पूजा कोल्लूरू दिग्दर्शीत महाकाली सिनेमाची तमाम प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
नक्की वाचा >> पनवेलमध्ये भयंकर घटना! SPY कॅमेरा लावून महिलेचा आंघोळीचा व्हिडीओ काढला, पोलिसांनी फार्म हाऊसवर धाड टाकली अन्..