Rohit Arya Detail Profile : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सर्वात खळबळजनक घटना घडली आहे. पवई परिसरात ऑडिशनसाठी आलेल्या 17 लहान मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झालाय. पवई येथील आरए स्टुडीओत ही मुलं ऑडिशन देण्यासाठी आली होती. लंच ब्रेकपर्यंत मुलं बाहेर न आल्याने त्यांच्या पालकांची चिंता वाढली होती. याचदरम्यान, एका व्यक्तीने व्हिडीओ शेअर करून मुलांना बंधक केल्याची माहिती दिली. रोहित आर्या असं या व्यक्तीचं नाव आहे, जो पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला आहे. रोहित आर्याने व्हिडीओच्या माध्यमातून धमकी दिली होती की,जर त्यांनी माझं ऐकलं नाही, तर तो स्टुडीओत आग लावेल. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. दरम्यान, पोलिसांनी सर्व मुलांना वाचवलं असून आरोपी रोहित आर्याचा खात्मा केला आहे.
कोण होता आरोपी रोहित आर्या?
रोहित आर्या पुण्यातील रहिवासी होता. रोहित आर्याने ऑगस्ट 2024 मध्येही गोंधळ घातला होता. ऑगस्ट 2024 मध्ये तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात रोहित आर्याने उपोषण केलं होतं आणि त्यावेळी त्याला अचानक फिट आली होती. फिट आल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. माझी शाळा, सुंदर शाळा या प्रकल्पाचे डिझाईनही त्यानेच केल्याचा दावा रोहितने केला होता. पण त्याची दखल घेतली नसल्याने त्याने सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते.
नक्की वाचा >> Mamata Kulkarni Video: ममता नाही तर 'ही' पाकिस्तानी अभिनेत्री होती डी कंपनीची खासमखास
प्रोजेक्ट लेट्स चेंज (Project Let's Change - PLC) या संस्थेचे संस्थापक व संचालक होते. 2013 मध्ये गुजरातमध्ये त्यांनी “स्वच्छता मॉनिटर” हा उपक्रम सुरू केला होता, तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी याबाबत त्याचं कौतुक केलं होतं. प्रोजेक्ट लेट्स चेंज (PLC) - ही NGO आहे, जी शाळांमध्ये स्वच्छता जागृती आणि मुलांना स्वच्छता दूत बनवण्यावर काम करते, ही संस्था चालवत होता. जी शाळांमध्ये स्वच्छता जागृती आणि मुलांना स्वच्छता दूत बनवण्यावर काम करते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी सूरज लोखंडे आणि संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे आणि सुमित भोसले यांनी त्यावेळी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. रोहित आर्याने पवई भागात ओलीस ठेवण्यात आलेली सर्व मुले 15 वर्षांखालील असून 17 मुला-मुलींना एका खोलीत बंद करुन ठेवण्यात आले होते. "मी आत्महत्या करण्याऐवजी या मुलांना बंदी बनवलं आहे, असं रोहित आर्याने व्हिडिओ शेअर करून सांगितलं. दरम्यान, एका प्रकल्पात आर्थिक नुकसान झाल्यामुळे रोहितने संबंधित विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.
नक्की वाचा >> पनवेलमध्ये भयंकर घटना! SPY कॅमेरा लावून महिलेचा आंघोळीचा व्हिडीओ काढला, पोलिसांनी फार्म हाऊसवर धाड टाकली अन्..
आरोपीनं असं का केलं?
आरोपीनं रोहित आर्याने अनेक सरकारी योजनांमध्ये पैशांची गुंतवणूक केली होती. यात त्याचा मोठा नुकसान झाला होता. यासाठी तो सरकार आणि संबंधीत विभागाला जबाबदार धरत होता. यासाठी त्याने सरकारशी संवाद साधण्यासाठी आणि स्वत:चा बचाव करण्यासासाठी हे खतरनाक पाऊल उचललं. दरम्यान, रोहित आर्याने आरोप केला होता की, त्याला त्याच्या प्रोजेक्टचे पैसे मिळाले नाहीत. त्यावेळी दीपक केसरकर मंत्री होते. त्याचदरम्यान रोहित आर्याने उपोषणही केलं होतं, अशी माहिती आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world