सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) फेम पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) याला लग्नाच्या अवघ्या तीन महिन्याच्या आतच घराबाहेर जावं लागलं आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पृथ्वीक प्रतापचा लग्नसोहळा पार पडला (Prithvik Pratap Married with Prajakta Waikul) . यंदा लग्नानंतर त्यांचा पहिला संक्रात सण होता. एकमेकांना तीळ गूळ दिल्यानंतर पृथ्वीकला त्याच्या बायकोने घराबाहेर काढले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पृथ्वीकने याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. बायकोला उलट बोलणं पृथ्वीकला महागात पडलं आहे. पृथ्वीकने बायकोला तिळगूळ देताना कमी बोलण्याचा सल्ला दिला. मग काय संतापलेल्या बायकोने त्याला थेट घराबाहेरचं काढलं. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रताप यांच्या विनोदबुद्धीचं चाहत्यांकडून नेहमीच कौतुक होत असतं, सोशल मीडियावरही तो सक्रिय असून त्याच्या व्हिडिओवर चाहत्यांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत असतात.
11 वर्षांनंतर केलं लग्न...
पृथ्वीक प्रताप गेल्या 11 वर्षांपासून प्राजक्ताला डेट करीत होता. शेवटी ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. सुरुवातीच्या टप्प्यात दोघेही अभिनय क्षेत्रात होते. त्यांनी एकत्रितपणे एकांकिका आणि नाटकांमध्ये काम केलं. मात्र प्राजक्ताने करिअर बदलण्याचा निर्णय घेतला. तिने एमबीएचं शिक्षण घेतलं. सध्या ती एका कॉर्पोरेट क्षेत्रात एचआर म्हणून काम करीत आहे.