Gaurav More New Home: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि 'चला हवा येऊ द्या' यांसारख्या लोकप्रिय शोजमधून प्रेक्षकांना आपल्या विनोदी अभिनयाने खळखळून हसवणारा मराठमोळा कलाकार आणि अभिनेता गौरव मोरे याचे एक मोठे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. मुंबईतील 'फिल्टरपाड्याच्या चाळीतून' थेट आलिशान टॉवरमध्ये जाण्याचा त्याचा प्रवास आता पूर्ण झाला आहे. म्हाडा लॉटरीमधून वर्षभरापूर्वी लागलेल्या पवई येथील घराची चावी नुकतीच मिळाली आहे.
गौरव मोरेसाठी हा क्षण अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा आहे. मुंबईतील चाळीमध्ये राहून त्याने मनोरंजन विश्वात आपले स्थान निर्माण केले. आता म्हाडाच्या माध्यमातून त्याचे स्वतःचे आलिशान घर घेण्याचे स्वप्न साकार झाले आहे.
(नक्की वाचा- Suraj Chavan Fiance's AI Photo: सुरज चव्हाणची होणारी बायको कशी दिसते? एआय PHOTOS व्हायरल)
म्हाडाच्या मुंबई मंडळाने मागील वर्षी (2024) 2,030 घरांसाठी सोडत जाहीर केली होती. अनेक सामान्य नागरिकांसोबतच गौरव मोरेनेही या लॉटरीत अर्ज भरला होता. त्याने कलाकार कोट्यातून पवई येथील उच्च उत्पन्न गटातील घरासाठी अर्ज केला होता आणि या सोडतीत तो विजेता ठरला होता.
घराचे बांधकाम सुरू असल्याने आणि 'ओसी' मिळण्यास वेळ लागल्यामुळे गौरव मोरेला वर्षभराची प्रतीक्षा करावी लागली. पण, अखेर आज त्याला त्याच्या नवीन घराच्या चाव्या मिळाल्याने त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे. या यशाने त्याच्या चाहत्यांनाही खूप आनंद झाला आहे.
(नक्की वाचा- 'बायकोच्या ब्रशने दात घासतो, तिचे न धुतलेले कपडे..', अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर पतीची झाली 'अशी' अवस्था!)
गौतमी देशपांडेलाही मिळाली चावी
गौरव मोरेसोबतच 'माझा होशील ना' फेम अभिनेत्री गौतमी देशपांडे हिलादेखील म्हाडा लॉटरीत घर मिळाले होते. ती देखील मागील वर्षीच्या सोडतीत विजेती ठरली होती. तिला गोरेगाव येथील घराची चावी मिळाली आहे. अनेक कलाकारांना म्हाडाच्या या सोडतीमुळे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे आणि गौरव मोरे, गौतमी देशपांडे यांच्यासारख्या कलाकारांसाठी ही एक मोठी उपलब्धी आहे.