Maharashtrachi Hasyajatra Video : हसणं हे सर्व आजारांवरील औषध आहे असं म्हणतात. कोरोनाच्या काळातील संकटातही महाराष्ट्राला हसत ठेवणाऱ्या हास्यजत्रेचा एक किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रेतील समीर चौगुले आणि इशा डे यांनी अमुक-तमूक या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती. यावेळी इशा डे हिने ओंकार राऊत सोबत घडलेला एक किस्सा शेअर केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इशा डेने सांगितलं की, एकदा दादरमधील दुकानासमोर एका व्यक्तीने ओंकार राऊतला साष्टांग नमस्कार घातला. सुरुवातीला त्याला मस्करी वाटली. मग ओंकारने त्याला उठवलं. तो समोरचा माणूस म्हणाला, मला अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यादरम्यान मी नियमित हास्यजत्रा पाहत होतो. एका स्किटला मी इतका हसलो की मी उठून उभा राहिलो. हे सांगताना ती व्यक्ती ढसाढसा रडत होती. या किस्स्याबद्दल बोलताना समीर चौगुले म्हणाले, कदाचित हे लोकांना खोटं वाटेल. पण अशा गोष्टी घडतात. केवळ हसण्यामुळे काही गोष्टी शक्य होतात.
नक्की वाचा - Prajakta Mali : मांसाहार हा माणसांसाठी नाहीच! प्राजक्ता माळीचं मोठं वक्तव्य
Video पाहण्यासाठी क्लिक करा
कोरोना काळात महाराष्ट्रातील नागरिकांची सकाळ-संध्याकाळ हास्यजत्रेशिवाय पूर्ण होत नव्हती. इतक्या कठीण परिस्थितीतही महाराष्ट्राच्या हास्यजत्रेने नागरिकांना धीर दिला असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.