Gaurav More Marriage: फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे अडकला लग्नबंधनात; कोण आहे त्याची पत्नी? PHOTO VIRAL

Gaurav More Marriage News: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता गौरव मोरे (Gaurav More) विवाहबंधनात अडकला आहे. लग्नासोबतच त्याने आपल्या नवीन घरात गृहप्रवेशही केला असून अभिनेत्री ऋतुजा बागवेने पोस्ट शेअर करत या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Gaurav More Marriage News: कोण आहे गौरव मोरेची पत्नी?"
Rutuja Bagwe Instagram

Gaurav More Marriage News: आपल्या विनोदी शैलीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारा आणि फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून प्रसिद्ध असणारा अभिनेता गौरव मोरे विवाहबंधनात अडकला आहे. गौरवने त्याची मैत्रीण प्रियांका कारेकर हिच्यासोबत नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे. सध्या सोशल मीडियावर या जोडीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे लग्नासोबतच गौरवने नवीन घरातही प्रवेश केला आहे.  

गौरव आणि प्रियांकाच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. गौरवची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने सोशल मीडियावर या नवदाम्पत्याचा फोटो शेअर करत या बातमीला दुजोरा दिला. ऋतुजाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मिस्टर आणि मिसेस मोरे, तुमच्या या नवीन प्रवासासाठी आणि तुमच्या सुंदर नवीन घरासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन! तुम्हाला प्रेम आणि आनंदाने भरलेल्या दीर्घायुष्यासाठी अनेक शुभेच्छा."

Advertisement

(नक्की वाचा: दूरदर्शनच्या या मालिकेने रामायण-महाभारतालाही दिलेली टक्कर, इरफान खान-रवी किशन मुख्य भूमिकेत; IMDbवर 8.1 रेटिंग)

गौरव मोरेची नवीन सुरुवात 

ऋतुजाच्या या पोस्टवरून हे स्पष्ट झाले आहे की, गौरवने केवळ लग्नच केले नाही, तर नव्या संसाराची सुरुवात एका नव्या वास्तूमध्ये केली आहे. लग्नासोबतच गृहप्रवेश झाल्याने मोरे कुटुंबात दुहेरी आनंदाचे वातावरण आहे. गौरवने आपल्या कष्टाने मुंबईत स्वत:चे घर स्वप्न पूर्ण केले असून, आता तिथे प्रियांकासोबत त्याने गृहप्रवेश केला आहे. गौरवची पत्नी प्रियांका देखील मनोरंजन क्षेत्राशी संबंधित असल्याचं म्हटलं जातंय. 

(नक्की वाचा: Sana Saeed: कुछ कुछ होता है फेम छोटी अंजली 37व्या वर्षी दिसते इतकी ग्लॅमरस; परदेशी बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा)

Photo Credit: Rutuja Bagwe Instagram

गौरव मोरेचा प्रवास 

गौरव मोरेने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरांत ओळख निर्माण केली. त्यानंतर त्याने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली. प्रियांकासोबतच्या त्याच्या या नवीन वाटचालीसाठी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. मोरे कुटुंबाच्या या गोड बातमीची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.