हिंदी चित्रपट सृष्टीतील सुपरहिट चित्रपटांची यादी 'मैंने प्यार किया' शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. सलमान खान आणि भाग्यश्री पटवर्धन यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला. एका संपूर्ण पिढीला भुरळ घातली. हा सिनेमा प्रदर्शित होऊन आता साडेतीन दशकं उलटली आहेत. तरीही याची जादू कायम आहे.
लता मंगेशकर यांनी एकाच दिवशी गायली सर्व गाणी
'मैंने प्यार किया' मध्ये लता मंगेशकर यांनी अनेक गाणी गायली आहेत. पण, ही सर्व गाणी त्यांनी एकाच दिवसात रेकॉर्ड केले होते हे तुम्हाला माहिती आहे का? लता मंगेशकर यांना विदेशात कार्यक्रमासाठी जायचं होतं. त्यामुळे त्यांनी फक्त एका दिवसामध्ये सर्व रेकॉर्डिंग पूर्ण केलं. ही सर्व गाणी सुपरहिट झाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाग्यश्री रात्रीतून शिकली स्केटिंग
या चित्रपटातील भाग्यश्रीचा स्केटिंग सीन अतिशय नैसर्गिक वाटतो. पण, खरं सांगायचं तर भाग्यश्रीला स्केटिंग अजिबात येत नव्हतं. सुरज बडजात्या यांनी या दृश्याचा चित्रपटात समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाग्यश्रीनं रात्रभर सराव केला. भाग्यश्रीच्या कष्टाचं चित्रपटात चीज झालं.
सलमान खान नव्हता पहिली चॉईस
मैंने प्यार किया मुळे 'प्रेम' अर्थातच सलमान खान घरोघरी पोहोचला. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल सलमान खान या रोलसाठी पहिली चॉईस नव्हता. सूरज बडजात्या यांनी अनेक नवोदित कलाकारांचे ऑडिशन घेतले. सलमान खान त्यावेळी लहान-मोठ्या जाहिरातीमध्ये काम करत होता. पीयूष मिश्रा यांचे नाव देखील या चित्रपटासाठी चर्चेत होते. पीयुष यांनीच एका मुलाखतीमध्ये याचा खुलासा केला होता. पण, सूरज बडजात्या यांना सलमानचं ऑडिशन आवडलं. त्यापुढील इतिहास तुम्हाला माहिती आहे.
( नक्की वाचा : Madhuri Dixit : 'पाकिस्ताननं युद्ध जिंकलं तर माधुरी दीक्षितला घेऊन जाईन', मौलानाचं संतापजनक वक्तव्य, Video )
भायश्रीनं केलं लग्न
मैंने प्यार किया चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यानच भाग्यश्रीनं लग्न केलं होतं. भाग्यश्रीनं हे लग्न आई-वडिलांच्या इच्छेच्या विरुद्ध केलं होतं. या लग्नात सलमान खान आणि सूरज बडजात्या उपस्थित होते.
'तो' सीन देण्यास नकार
भाग्यश्रीनं या चित्रपटात किसिंग सीन करण्यास नकार दिला होता. भाग्यश्री पारंपाकिक कुटुंबातील मुलगी होती. तिला घरी फक्त चुडीदार घालण्यास परवानगी होती. तिनं आयुष्यात पहिल्यांदाच जीन्स आणि वन पीस ड्रेस या चित्रपटासाठी घातला होता.