
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे पुरावे समोर आले आहेत. हल्लोखोरांना संरक्षण देणाऱ्या सर्वांना धडा शिकवण्याचं भारतानं जाहीर केलंय. त्यादृष्टीनं तयारी देखील सुरु केली आहे. भारतानं पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी केलीय. त्याचवेळी पाकिस्ताननंही युद्धाची तयारी सुरु केलीय. भारताला युद्धाचं आव्हान देत असताना पाकिस्तानी नागरिकांचा भारतद्वेष देखील उफाळून आलाय. पाकिस्तानी मौलानाचं एक वादग्रस्त वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माधुरी दीक्षितला घेऊन जाईन
पाकिस्तानच्या मौलनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये भारत-पाकिस्तान युद्धावर बोलत असताना या मौलानं संतापजनक वक्तव्य केलं आहे. याबाबतच्या व्हायरल व्हिडिओमध्ये हा मौलाना त्याच्या मुलाच्या बाजूला बसलाय. तो भारत-पाकिस्तान युद्धाबाबत बोलताना म्हणाला की, पाकिस्ताननं हे युद्ध जिंकले तर माधुरी दीक्षितला घेऊन जाईन.
पाकिस्तानी मौलवीचा हा व्हिडिओ पाहून नेटीझन्सनं संताप व्यक्त केलाय.
This maulana wants to take Madhuri Dixit after Pakistan attacks India . This is their level of filth which came to them after years of turning the pages of Aasmani 📖 #IndiaPakistanWar #PahalgamTerrorAttack pic.twitter.com/cZ5oaHWuuz
— Amitabh Chaudhary (@MithilaWaala) May 6, 2025
244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभृूमीवर देशभरातील 244 जिल्ह्यांमध्ये 'मॉक ड्रिल' आयोजित करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयानं दिले आहेत. नागरी संरक्षणाची तयारी किती आहे हे पाहणं आणि ती सुधारणं हा या मॉक ड्रिलचा उद्देश आहे.
( नक्की वाचा : युरोपियन देशाचा दिसला खरा चेहरा! भारताच्या मदतीचा पडला विसर, पाकिस्तानसाठी पाठवली युद्धनौका )
महाराष्ट्रात कुठं होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रीलचं आयोजित करण्यात आलं आहे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, सार्वजनिक ठिकाणं, शाळा, रेल्वे स्टेशन, बस आणि गर्दीच्या भागात मॉक ड्रिल किंवा अभ्यास ड्रिल करण्यात येईल.
महाराष्ट्रातील खालील ठिकाणी मॉक ड्रील होणार आहे
मुंबई, उरण, तारापूर
ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, थळ वायशेत (रायगड जिल्हा) , पिंपरी-चिंचवड
छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
नाशिक जिल्ह्यात तीन ठिकाणी होणार मॉक ड्रिल
नाशिक, मनमाड आणि सिन्नरमध्ये होणार मॉक ड्रिल
नाशिक, सिन्नरला असणाऱ्या लष्करी छावण्या, मनमाडला असणारा पेट्रोलियम डेपोमुळे तीन ठिकाणी होणार मॉक ड्रिल
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world