Malaika arora: मलाइका अरोराच्या हॉटेलचा मेन्यू पाहून फुटेल घाम! एक प्लेटची किंमत पाहून व्हाल हैराण

देशातील पहिले हायड्रेशन बार म्हणून हे नावारूपाला येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • मलाइका अरोराने वांद्रे येथील ९० वर्षे जुन्या इंडो-पोर्तुगीज बंगाल्यात ‘स्कारलेट हाउस’ रेस्टॉरंट सुरू केले आहे
  • मलाइकाच्या रेस्टॉरंटमध्ये तिचा मुलगा अरहान खान आणि व्यावसायिक धवल उदेशी, मलय नागपाल हे भागीदार आहेत
  • ‘स्कारलेट हाउस’ मध्ये देशातील पहिले हायड्रेशन बार सुरू करण्यात आला असून त्यात थकवा दूर करणारी पेये उपलब्ध आहेत
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Malaika arora open restaurant Scarlett House: बॉलिवूड अभिनेत्री मलाइका अरोरा आता शिल्पा शेट्टीच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. ती हॉटेल व्यवसायात उतरली आहे. वांद्रे येथील पाली व्हिलेजमधील एका 90 वर्षे जुन्या इंडो-पोर्तुगीज बंगल्यात तिने ‘स्कारलेट हाउस' (Scarlett House) हे रेस्टॉरंट सुरू केले आहे. या व्यवसायात तिचा मुलगा अरहान खान आणि व्यावसायिक धवल उदेशी, मलय नागपाल हे तिचे भागीदार आहेत. या हॉटेलची सध्या चांगलीच चर्चा आहे. शिवाय इथल्या पदार्थांची किंमत ही सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. 

मलाइकाचे हे रेस्टॉरंट त्याच्या वेगळ्या संकल्पनेमुळे आणि महागड्या पदार्थांमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. येथे केवळ जेवणच नाही, तर कॉफी बार, वाईन रूम आणि डायनिंग स्पेसची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. इथले दर हे सर्व सामान्यांच्या आवाक्या बाहेरचे असल्याचं मेन्यू कार्डवरून दिसत आहे. या हॉटेलमध्ये साधी मसाला खिचडी 550 रुपयांना मिळत आहे. तर शॅम्पेनची किंमत तब्बल 20,900 रुपये इतकी आहे.

नक्की वाचा - Alcohol Advice: दारू पिण्याची योग्य पद्धत कोणती? दारू प्यायल्यानंतर काय करावं? 99 टक्के लोकांना माहितच नाही

देशातील पहिले हायड्रेशन बार म्हणून हे नावारूपाला येत आहे.  या रेस्टॉरंटचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे सुरू करण्यात आलेले देशातील पहिले 'हायड्रेशन बार' (Hydration Bar). या बारमध्ये थकवा दूर करणारी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी पेये मिळतील. विशेष म्हणजे, येथे मिळणाऱ्या ‘अँटी एजिंग' पाण्याची किंमत 350 रुपये आहे. तसेच मद्यपानानंतर हँगओव्हर उतरवण्यासाठी विशेष पाण्याची सोयही येथे करण्यात आली आहे. त्याची किंमतही तितकीच जबरदस्त आहे. मात्र की जाहीर करण्यात आली नाही. तिथे गेल्यानंतर त्याची किंमत सांगितली जाते. 

नक्की वाचा - Beer Bottle: बिअर बाटलीच्या झाकणाला 21 कडा असल्याचं कारण काय? 133 वर्षांपूर्वीचं रहस्य माहित आहे का?

हॉटेलमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही जेवणांची सोय आहे. मेन्यू कार्डनुसार, येथे मसाला खिचडी 550 रुपयांना, तर शॅम्पेनची बाटली 20,900 रुपयांना उपलब्ध आहे. मद्यप्रेमींसाठी हँगओव्हर घालवणारे विशेष पेय देखील येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. सध्या या हॉटेलचे फोटो आणि मेन्यू कार्ड इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत. त्याच्या किंमती या सर्वांनाच हैराण करणाऱ्या आहेत. 

Advertisement