- बिअरच्या बाटलीच्या झाकणावर नेहमी २१ कडा असतात, जे १८९२ पासून वापरले जात आहेत
- विल्यम पेंटर यांनी या झाकणाचा आधुनिक डिझाइन शोधून क्राऊन कॉर्क अँड सील कंपनी स्थापन केली
- २१ कडांचा आकडा वैज्ञानिक संशोधनानुसार बिअर ताजी ठेवण्यासाठी आणि गॅस बाहेर पडू न देता सर्वात सुरक्षित आहे
विलियम पेंटर यांचा ऐतिहासिक शोध बिअरची बाटली उघडताना अनेकजण विविध कसरती करतात, मात्र बाटलीच्या झाकणाकडे (Crown Cap) कोणाचे फारसे लक्ष जात नाही. या झाकणाला नेमक्या २१ कडा असतात. हे डिझाइन आजचे नसून १८९२ पासून जगभरात वापरले जात आहे. विल्यम पेंटर यांनी या आधुनिक कॅपचा शोध लावला आणि 'क्राऊन कॉर्क अँड सील' कंपनीची स्थापना केली.
बिअरमधील कार्बन डायऑक्साइड टिकवून ठेवण्यासाठी आणि ती ताजी ठेवण्यासाठी पेंटर यांनी अनेक प्रयोग केले. सुरुवातीला कडांची संख्या कमी-जास्त करून पाहण्यात आली. संशोधनाअंती असे आढळले की, जर कडांची संख्या २१ पेक्षा कमी असेल, तर झाकण सैल होऊन गॅस बाहेर पडतो आणि बिअर खराब होते. दुसरीकडे, जर कडांची संख्या 21 पेक्षा जास्त ठेवली, तर झाकण इतके घट्ट बसते की बाटली उघडताना काच तडकण्याची भीती असते. त्यामुळे 21 कडांचा आकडा हा विज्ञानाच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित आणि प्रभावी ठरला आहे. 133 वर्षांनंतरही हेच तंत्रज्ञान आजही जगभरात प्रमाण मानले जाते.
पार्टी असो वा गेट-टुगेदर, बिअरची बाटली उघडण्यासाठी अनेकजण दातांचा किंवा किचनच्या वस्तूंचा वापर करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की बिअरच्या प्रत्येक झाकणाला 21 कडाच का असतात? 20 किंवा 22 का नाहीत? यामागे एक मोठे वैज्ञानिक कारण दडलेले आहे. 1892 मध्ये विल्यम पेंटर यांनी हे खास डिझाइन तयार केले होते. विल्यम पेंटर यांनी बाल्टिमोरमध्ये जेव्हा ही कंपनी सुरू केली, तेव्हा त्यांनी झाकणांच्या डिझाइनवर खूप संशोधन केले. जर कडांची संख्या कमी असेल, तर बिअर लीक व्हायची आणि त्यातील 'फेस' (Carbonation) निघून जायचा. याउलट कडा जास्त केल्यास ओपनरने बाटली उघडताना काचेला तडे जात होते.
नक्की वाचा - चहा सोबत काय खावू नये? 'हे' पदार्थ खाणे टाळा नाही तर अनेक समस्यांचे व्हाल शिकार
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world