जाहिरात

मल्लिका शेरावतने 'व्हाईट हाऊस'मध्ये ट्रम्प यांच्या ख्रिसमस डिनरला लावली हजेरी; "आमंत्रण कसं मिळालं?"...

Mallika Sherawat Attends White House Christmas Dinner : मल्लिकाने केवळ आपले फोटोच नाही, तर कार्यक्रमाच्या आतले काही खास व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित पाहुण्यांना संबोधित करताना दिसत आहेत.

मल्लिका शेरावतने 'व्हाईट हाऊस'मध्ये ट्रम्प यांच्या ख्रिसमस डिनरला लावली हजेरी; "आमंत्रण कसं मिळालं?"...

बॉलिवूडची 'मर्डर' फेम अभिनेत्री मल्लिका शेरावत हिने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मल्लिकाने नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयोजित केलेल्या 'व्हाईट हाऊस ख्रिसमस डिनर'मध्ये सहभाग घेतला. या अत्यंत खास आणि मर्यादित पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमाचे क्षण तिने आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मल्लिकाचा 'स्टायलिश' लुक

या विशेष कार्यक्रमासाठी मल्लिकाने गुलाबी रंगाचा स्लिप ड्रेस परिधान केला होता, ज्यासोबत तिने फर जॅकेट मॅच केले होते. व्हाईट हाऊसच्या प्रवेशद्वारावर तिने दिलेली पोझ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. मल्लिका या लूकमध्ये अत्यंत ग्लॅमरस आणि मोहक दिसत होती.

डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण आणि आमंत्रण

मल्लिकाने केवळ आपले फोटोच नाही, तर कार्यक्रमाच्या आतले काही खास व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित पाहुण्यांना संबोधित करताना दिसत आहेत. याशिवाय, मल्लिकाने तिला मिळालेल्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेचा फोटोही पोस्ट केला आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "व्हाईट हाऊसच्या ख्रिसमस डिनरला आमंत्रित होणे हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे - मी खूप आभारी आहे."

चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

मल्लिकाच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर आला आहे. अनेकांनी तिचे अभिनंदन केले असून "तू जागतिक स्तरावर चमकत आहेस," अशा शब्दांत तिचे कौतुक केले आहे. मात्र, काही नेटकऱ्यांनी तिला हे आमंत्रण नक्की मिळाले कसे, असा सवाल विचारला आहे. एका युजरने विचारले की, "अभिनंदन! पण तुला हे आमंत्रण कसे मिळाले? मला जाणून घ्यायला आवडेल." तर काहींनी याला 'शो ऑफ' असेही म्हटले आहे.

व्हाईट हाऊसशी जुने नाते

विशेष म्हणजे, मल्लिका शेरावतची व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी एप्रिल 2011 मध्ये बराक ओबामा यांच्या कार्यकाळात तिने 'व्हाईट हाऊस करस्पॉडंट्स डिनर'ला हजेरी लावली होती. त्यावेळी तिच्या 'पॉलिटिक्स ऑफ लव्ह' या चित्रपटामुळे तिला हे विशेष निमंत्रण मिळाले होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com